संत निळोबाराय अभंग

आशाबध्दाचिया मुखें – संत निळोबाराय अभंग – ९९२

आशाबध्दाचिया मुखें – संत निळोबाराय अभंग – ९९२

आशाबध्दाचिया मुखें ।
निघे अक्षर तें तें फिकें ॥१॥
श्रवणीं बैसोनियां श्रोता ।
विटे ऐकुनी त्याची कथा ॥२॥
न करुनियां नमस्कार ।
अव्हेरिती नारीनर ॥३॥
निळा म्हणे जळो जिणें ।
सदा त्याचें लाजिरवाणें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आशाबध्दाचिया मुखें – संत निळोबाराय अभंग – ९९२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *