मज नामाची आवडी – संत निर्मळा अभंग
मज नामाची आवडी ।
संसार केला देशघडी ॥१॥
सांपडलें वर्म सोपें ।
विठ्ठल नाम मंत्र जपे ॥२॥
नाहीं आणिक साधन ।
सदां गाय नारायण ॥३॥
निर्मळा म्हणे देवा ।
छंद येवढा पुरवावा ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.