बडोद्याचे कुबेरेश्र्वराचे दत्तमंदिर

बडोद्याचे कुबेरेश्र्वराचे दत्तमंदिर

बडोद्याचे कुबेरेश्र्वराचे दत्तमंदिर

स्थान: बडोदा शहरात मध्यभागी (गुजरात राज्य)

विशेष: महाराणी जमनाबाई यांनी हे बनवले. जागृत कुबेरश्वर दत्त मंदिर म्हणून ओळखले जाते.
पूर्वी बडोदा शहराच्या मध्यभागी मांडवीच्या उंच मनोऱ्यावर भगवा झेंडा फडकत असे. जवळच्या सरकारवाड्यात राजकुटुंबाचा निवास असे. मनोऱ्याच्या खालील राजमार्गावर एक वेडसर मनुष्य भटकत असे. वेडा कुबेर म्हणून लोक त्याला ओळखत. एकदा एक पिसाळलेला हत्ती त्याने आवरून धरल्यामुळे त्याच्या दैवी सामर्थ्यावर महाराणीसाहेब खूष झाल्या. श्रीजमनाबाईंनी त्याला आपल्या गुरुस्थानी मानले. त्याच्या नावे महादेवाचे मंदिर उभारले.

त्याच्या समोरच असलेले दत्तमंदिर कुबेरेश्र्वराचे दत्तमंदिर म्हणून प्रसिद्ध असून अनेक दत्तभक्तांची या दत्तावर निष्ठा आहे. दत्तबावनीचे पाठ येथे दर गुरुवारी म्हटले जातात. दत्तसंप्रदायिक अनेक वृत्ते व ग्रंथ वाचनही येथे होते. श्री दत्तजयंती व गुरुपौर्णिमा हे उत्सव येथे साजरे होतात.


बडोद्याचे कुबेरेश्र्वराचे दत्तमंदिर समाप्त

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *