धनदाई माता म्हसदी

धनदाई माता म्हसदी

धनदाई माता म्हसदी – श्री धनदाई देवीची महती

सिद्धी बुद्धिप्रदे देवी, भुक्तिमुक्ति प्रदायिनी ।।
मंत्र, यंत्र, मूर्ती सदा देवि, धनदाई नमोस्तुते ।।

ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांची उपासना करून द्रैत्यानी अनक इच्छित वर प्राप्त केल्यानंतर दैत्य अर्जिक्य, अत्याचारी बनले. सातपुडा परिसरातील जनतेवर दैत्य अत्याचार करू लागले. त्याच्या अत्याचारापासून रक्षण करण्यासाठी जनतेने आदीशक्तीची करूणा भाकली भक्तांच्या प्रार्थेला प्रसत्न होऊन धनदाई, सप्तश्रंगी, म्हाळसा, एकक्णि. चिराई, भटाई, रेणुका अशा या सप्तभगिनींच्या रूपाने आदीशक्ती खानदेशात अवतरली.

या सप्तभगिनींनी दैत्यांना युद्धाचे आव्हान केले. त्यांच्यात घनघोर युद्ध झाले. त्या युद्धात दैत्य पराभूत झाले आणि वेगवेगळ्या दिशेने पळत सुटले. रेड्याचे रूप घेऊन ठिकठिकाणी जंगलामध्ये लपून बसले. तेव्हा वा सप्तभगिनी त्यांचा पाठलाग करीत, त्या जंगलात पोहोचल्या व रेड्याच्या रूपात असलेल्या दैत्यांचा त्यांनी नाश केला. त्या सप्तभगिनींपैकी “घनदाई’ ही आदिशक्ती अवतरली व त्याठिकाणी रेड्याच्या रूपात लपलेल्या दैत्यांचा नाश केला.

कालांतराने भामरेच्या किल्ल्यावर वास्तव्यास असलेले देवरे कुलीन मराठे गुरे पाळण्याचा व्यवसाय करीत असत. भामरेच्या किल्ल्याचा पाडाव झाल्यानंतर तेथील सर्व देवरे विखुरले गेले व आज जेथे आदिशक्ती धनदाई देवीचे मंदिर आहे, त्याठिकाणी वास्तव्यास आले. “नायगांव नावाच्या गावाची स्थापना केली. त्यांना दृष्टांत मिळाल्यानुसार त्यांनी तेथे कुलसरक्षणासाठी धनदाई देवीच्या स्वयंभू मूर्तीची स्थापना केली व त्यांच्या जवळ असलेली सर्व संपत्ती धनदाई देवीची स्थापना करण्यापूर्वी त्याच ठिकाणी जमिनीत पुरली व त्या वरती धनदाई देवीची स्थापना केली.

नायगावात बरीच वर्षे वास्तव्य केल्यानंतर जंगली प्राण्यांचा उपद्रव, पाण्याची दुर्मिळता तसेच दरोडेखोरांचा त्रास या सर्व गोष्टींना कंटाळून तिथून जवळच असलेल्या नदी पलीकडील त्याकाळचे ‘म्हैसपाडा’ म्हणजेच आजचे ‘म्हसदी’ याठिकाणी स्थलांतर केले. त्याकाळी पूजा करतांना देवीच्या मूर्तीला शेंदूर लावण्याची प्रथा होती. पिढ्यान्‌ पिढ्या देवीच्या मूर्तीला शेंदूर लावल्यामुळे ती मूर्ती पूर्णत: शेंद्रात गाढली गेली व त्याठिकाणी देवीची मूर्ती होती हे पुढील पिढ्यांच्या लक्षात देखील आले नाही. कालांतराने हे जागृत देवस्थान दुर्लक्षित झाले. जंगलात वास्तव्यास असलेले भिल्ल त्या देवस्थानाचा सांभाळ करू लागले. म्हसदी या गावापासून दीड (१.५) किलोमीटर अंतरावर डोंगरांच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात आजही हे देवस्थान भक्तीचे प्रतिक म्हणून उभे आहे.

धनदाई माता

 

 

 

 

 

धनदाई माता – कथा देवी अवताराची !

देवी अवताराची कथा मोठी विलक्षण आहे. देवरे कुळातील आज जेथे आदिशक्ती धनदाई देवीचे मंदिर आहे त्या ठिकाणी म्हणजे नयगावी वास्तव्यास आले . त्यांनी तेथे कुल संरक्षणासाठी धनदाई देवीच्या स्वयंभू मूर्तीची स्थाफना केली. नायगावात बरेच वर्ष वास्तव्य केल्यानंतर जंगली प्राण्यांचा उपद्रव, पाण्याची दुर्मिळता तसेच दरोडेखोरांचा त्रास या सर्व गोष्टीना कंटाळून तिथून जवळचा असलेल्या नदीपलीकडील त्याकाळचे म्हीसपाडा म्हणजेच आजचे म्हसदी या ठिकाणी स्तलांतर केले .त्या काळी पूजा करताना देवीच्या मूर्तीला शेंदूर लावण्याची प्रथा होती. पिढ्यानपिढ्या मूर्तीला शेंदूरलावल्यामुळे ती मूर्ती शेंदूरमुले लुप्त झालीव त्या ठिकाणी मूर्ती होती हे पुढील पिढ्यांना लक्ष्यात आले नाही . कालंतराने हे देव्स्तान दुर्लक्षित झाले.

जंगलात वास्तव्य असणारे भिल्ल त्या देवस्थान चा सांभाळ करू लागले. इसवी सन १९६४ मध्ये धनदाई देवीने दाखविलेल्या चमत्कारामुळे दुर्लक्षित झालेले हे देवस्थान पुन्हा भक्तांच्या नजरेत आले .साक्री येथील पोस्टमास्तर यांची पत्नी सौ .प्रमिला कुलकर्णी यांच्या अंगात देवीचा संचार झाला.

धनदाई देवी त्यांच्या स्वप्नात येऊ लागली. त्यानंतर त्या स्वफुर्तीने धनदाई देवीच्या दर्शनासाठी म्हसदी गावात आल्यानंतर त्यांच्या अंगात देवीने संचार केला व येथून त्या देहभान विसरून धनदाई देवीच्या मंदिराकडे धावत सुटल्या. गावातील अनेक व्यक्ती त्यांचा मागे मंदिरापर्यंत येऊन पोचले . त्यांनी देवीची गळाभेट घेतली आणि त्या मूळ मूर्तीची तिथले शेंदुरलेपण विलग झाले. तिथे प्रकाश केल्यानंतर शेंदूर निघालेल्या ठिकाणी देवीचा कोरीव मुकुट असल्याचे दिसले. मुर्तीवरला शेंदूर काळजीपूर्वक काढण्यात आला तेव्हा आत मध्ये साडेतीन फुटाची सुबक कोरीव मूर्ती भक्तांच्या निदर्शनास आली .

धनदाई माता – चमत्कार

इ.स. १९६४ साली धनदाई देवीने दाखविलेल्या चमत्कारामुळे दर्लक्रित झालेले हे देवस्थान पुन्हा भक्तांच्या नजरेत आले. न ज्याप्रमाणे अस्ताला गेलेला सूर्य पुन्हा उदयास येतो. त्याचप्रमाण २ जागृत देवस्थान पुन्हा उदयास आले. त्याकाळी घडलेला चमत्कार तो असा. कै. श्री. प्रभाकर मार्तंड कुलकर्णी (लामकानीकर) हे माझे वडील नंदुरबार येथे पोस्टमन म्हणून काम करीत होते. सौ.प्रमिला प्रभाकर कुलकर्णी ही माझी आई, नंदुरबार येथे रहात असतांना नाकाच्या, कानाच्या आजाराने त्रस्त होती.

अनेक वैद्य, हकीम ह्यांचा इलाज करूनही गुण येत नव्हता. शिवाय रोज डोक्यावर भला मोठा दगड घेऊन चालणारी बाई स्वप्नात दिसत होती. त्यावेळी आई-वडिलांना याचा अर्थ कळत नव्हता असे बरेच दिवस निघून गेले. आईचा आजार वाढतच होता. स्वप्न पडणे चालू होते. शेवटी वडिलधाऱ्या लोकांच्या सांगण्यावरून वडील व आई एके दिवशी ‘म्हसदी’ येथे देवीच्या दर्शनासाठी आले आणि आमच्या आईला पहिला देवीचा संचार झाला. वडील खूप घाबरले होते, काही कळत नव्हते. शेवटी आईसाहेबांनीच स्वत:ची ओळख सांगितली व देवीची सेवा करण्याची आज्ञा दिली. तेव्हापासून आमच्या कुटुंबात देवीचा संचार सुरू झाला. तो आजतागायत पत्नी सौ. हेमलता रमेश कुलकर्णी हिच्या हातून चालू आहे. नंतर आई-वडील नंदुरबार येथे परत आले. स्वप्न पडतच होते. त्यात आता संचारदेखील सुरू झाला होता. संचारात माझ्यावरचा भार कमी करा, मला मोकळे करा, ‘ असे सांगितले जात होते.

एक दिवस वडिलांनी संचारात प्रश्न विचारला, ‘स्वप्नाचा अर्थ काय? आपल्यावर कोणता भार आहे?’ असे विचारल्यावर आईसाहेबांनी देवीच्या अंगावरील शेंदुराची कल्पना दिली. वास्तविक त्यावेळी म्हसदी येथील देवळात जी मूर्ती होती तो फक्त एक शेंदुराचा छोटा डोंगर होता. सर्व लोक देवी म्हणतात, म्हणून आम्हीही म्हणावे यापलीकडे काहीच नव्हते. वडिलांच्या पुढे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. देवीचे मंदिर गावातील लोकांचे म्हणजे गावदेवीचे स्वरूपात होते. अतिशय घनदाट जंगल होते. शेंदुर काढायचा कसा? कोणी काढायचा? मूर्ती नाही निघाली तर गावकरी काय प्रतिक्रिया देतील ? गावातून सहीसलामत परत जाणे होईल का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळे त्याची बरेच दिवस हिंमत होत नव्हती. पण आईसाहेबांना ते काम आमचेकडूनच करावयाचे होते. त्याच वेळी वडिलांना बढती मिळाली व त्यांची बदली साक्री येथे मल ओव्हरसियर’ म्हणून झाली. तसे माझे आजोबा मालपूर (कासारे) येथील असल्याने साक्री गाव सोईचे वाटत होते.

पण भविष्यात फारच वेगळे लिहिले होते. आईसाहेबांनी त्यांच्या कार्यासाठी वडिलांना साक्री येथे आणले होते. असो. साक्री येथे मुख्य बाजारपेठेत श्रीरामाचे मंदिर आहे. त्यांच्यासमोर ‘बच्चु टेलर्स’ ह्याचे दुकान होते व त्याचेच घर आम्हाला भाड्याने मिळाले होते. त्यांचे वडील कै.श्री.बाबूराव चंद्रात्रे त्याकाळातील नावाजलेले ज्योतिषी होते. वडील, आम्ही तेथेच रहात होतो. आईचा संचार सुरू होता. तब्येत तशीच होती. नाका, कानाचे आजार होते, स्वप्न सुरू होते, संचारात तेच तेच मार्गदर्शन होत होते. शेवटी एक दिवस वडिलांनी हा विषय श्री.बाबूराव चंद्रात्रे ह्यांना सांगितला व आश्चर्य म्हणजे ते चंद्रात्रे नुसते ज्योतिषी नव्हते तर ते दगडी शिल्पकारही होते!

आईसाहेबांनी आम्हाला योग्य ठिकाणी नेऊन बसविले होते. त्यावेळी चंद्रात्रे ह्यांनी म्हसदी’ येथे प्राथमिक भेट देण्याचे ठरविले. एका रविवारी ते तेथे येऊन गेले, कोणालाही कळू दिले नाही. एकंदर परिस्थिती पाहता त्यांनाही काळजी होती. शेवटी सर्वांनी ‘जे व्हायचे ते होऊ दे’ असे ठरविले, कारण जगणे -मरणे महत्त्वाचे राहिलेच नव्हते. एका रविवारी शेंदूर काढण्याच्या संदर्भात घरी आरती करून मार्गदर्शन विचारले गेले. त्यावेळी आईसाहेबांनी अत्यंत हर्ष उल्साहाने खालील मार्गदर्शन केले.

धनदाई माता – म्हसदीला कशे जावे ?

धनदाई मातेचे मंदिर साक्री तालुक्यातील म्हसदी गावालगत दीड किलोमीटर अंतरावर वसले आहे . नकाशामध्ये हिरव्या रंगाचा एक ‘D’ दाखवला आहे तेथे आहे म्हसदी गाव !! तुम्ही जर धुळे किवां साक्री-मार्गे जात असाल तर राष्ट्रीय महामार्ग ६ (NH-6) ने जाऊ शकता. म्हसदी हे साक्री पासून २० किलोमीटर अंतरावर आहे .


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *