pandharpur

pandharpur – पंढरपूर

pandharpur information in marathi


हे महाराष्ट्र राज्यातील सोलापूर शहराच्या पश्चिम बाजूला भीमा नदीच्या काठावर वसलेले एक तीर्थक्षेत्र आहे. हे एक धार्मिक ठिकाण आहे जेथे हजारो तीर्थयात्री येतात. भगवान विष्णुचा अवतार विठोबा आणि त्यांची पत्नी रुक्मिणी यांच्या सन्मानार्थ, या शहरात उत्सव साजरा केला जातो. १२ व्या शतकात देवगिरीचे यादव शासकांनी मुख्य मंदिर बांधले होते. २००१ च्या जनगणनेनुसार पंढरपूरची लोकसंख्या ९१३३८ आहे.

भक्त पुंडलिकाच्या आग्रहाखातर आणि त्याने फेकलेल्या विटेवर तो सावळा विठू कमरेवर हात ठेवून उभा राहिला आणि पंढपूर (pandharpur) हे महाराष्ट्राचे आद्य तीर्थक्षेत्र बनले. भागवत धर्माची पताका पंढपुरीच्या विठ्ठलाखातर अनेक वर्षे दिमाखात फडकत आहे. महाराष्ट्रातील भोळ्या भा़बड्या जीवांवर या पंढरीच्या विठूने आपले मायाजाल फेकले आहे. त्याच्यासाठी लांबून लांबून लोक दरवर्षी चालत येतात. या पंढरीच्या(pandharpur) दरबारात नेमके काय आहे याचा वेध तर घेऊया.

 • विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाच्या समाधीचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे.
 • पंढरपुरास (temple of pandharpur) भीमा नदीचा प्रवाह अर्धचंद्राकृती आहे; म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात.

 • तिच्या वाळवंटात पुंडलिकाची समाधी आहे. येथून विठ्ठलमंदिर (temple in pandharpur) जवळच आहे.

 • मंदिर(pandharpur temple) पूर्वाभिमूख असून त्यास तटबंदी आहे. त्याला एकूण आठ दरवाजे आहेत.

 • पूर्वेकडील महाद्वारास नामदेव दरवाजा म्हणतात. तेथे रस्त्यावरुन पोहोचण्यास बारा पायऱ्या आहेत.

 • त्यांतील पहिली पायरी नामदेव पायरी. लोक या पायरीला पाय न लावता पुढे जातात.

 • संत चोखामेळा यांची समाधी या पायरीसमोर उजव्या बाजूच्या घराच्या कोपऱ्यात आहे.

 • आत जाताच छोटा मुक्तीमंडप आहे. तेथे डाव्या हातास गणपती व महाद्वाराच्या माडीवर नगारखाना आहे.

 • येथे गरुडाचे व समर्थ रामदासांची स्थापिलेल्या हनुमंताचे मंदिर आहे.

 • यानंतरच्या अरुंद दगडी मंडपाच्या (सो-याच्या) भिंतीत तीन दरवाजे आहेत.

 • मधल्या दरवाज्याच्या दोन बाजूंस जयविजय हे द्वारपाल व गणेश आणि सरस्वती आहेत.

 • मधल्या दारातून आपण सोळखांबी मंडपात जातो.

 • तेथे छतावर दशावतारांची व कृष्णलीलेची चित्रे आहेत.

 • हे सर्व काही आपल्याला पंढरपुरात पाहायला मिळतं.


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

TAGS:- temples in pandharpur

6 thoughts on “pandharpur – पंढरपूर”

 1. ह भ प श्री न्यानेश्वर माधव काठे जानोरी दिंडोरी नाशिक

  छान माहिती दिलीत त्या बद्दल मी आपला आभारी आहे

  1. धन्यवाद महाराज तुमची अशीच साथ हवीय तुम्ही आम्हाला नक्की काहीं बदल करायचा असेल तर नक्की सांगा महाराज

  2. धन्यवाद महाराज तुमची अशीच साथ राहूद्या आणि तुमचाही प्रोफाइल क्रियेट करून घ्या आणि आम्हाला असाच सल्ला देत चला.

 2. सोमनाथ तळेकर

  Khupch Chan mahiti.तुमच्याकडे मृत्युंजय ही कादंबरी आहे का?असेल तर मला सेंड करा please.

  ।।राम कृष्ण हरी।।

  1. राम कृष्ण हरी महाराज तुमची पण नोद करून घ्या महाराज

  2. महाराज भेटली तर नक्की सांगेन तुमचा पण तुमचाही प्रोफाइल क्रियेट करून घ्या

Leave a Comment

Your email address will not be published.