devgad

devgad newasa – देवगड नेवासे

श्री क्षेत्र देवगड नेवासे (devgad newasa)

स्थान: नेवासे तालुका, अहमदनगर जिल्हा (महाराष्ट्र)
त्पुरूष: किसनगिरी महाराज.
विशेष: सर्वांग सुंदर प्रसंन्न दत्त मूर्ती, किसनगिरी महाराज समाधी, शिव मंदिर, उद्यान.

नगर औरंगाबाद रस्त्यावर नगरपासून सुमारे ६६ कि. मी. वर श्रीक्षेत्र देवगड(devgad newasa) आहे. हे पवित्र क्षेत्र म्हणजे भूलोकावरील स्वर्गच म्हणता येईल. सदर मंदीर हे अत्यंत सर्वांगसुंदर व पवित्र क्षेत्र नेवासेपासून जवळच आहे. सदर देवस्थान प. प. श्री किसनगिरीजी महाराज यांनी स्थापन केलेले आहे. देवगड या क्षेत्राचा विकास भास्करगिरी महाराजांनी केला.

संपूर्ण देवगड (devgad newasa) मंदिराची वास्तु ही अत्यंत देखणी असून प्रामुख्याने दत्तमंदीर आहे. संपूर्ण भव्य मंदीर राजस्थानातील आणलेल्या संगमरवरी दगडातून पूर्ण बांधकाम केलेले आहे. मंदिराचे फरशी कामही संगमरवरी असून मंदिरास ४ फूट उंचीचा सोनेरी कळस आहे. अत्यंत सर्वांगसुंदर प्रसन्न दत्तमूर्ती हेच येथील प्रमुख आकर्षण आहे.

येथील मूर्ती समोरून हटावेसेच वाटत नाही. ही अत्यंत जिवंत आणि जागृत दत्तमूर्ती आहे. संपूर्ण मंदिर परिसरच अत्यंत मंगल व पवित्र स्पंदनाने भारावलेला आहे. या मंदिर परिसरात सातत्याने चालू असणारे मंत्र उच्चारण मंदिराच्या पवित्र वातावरणात भरच टाकते. या मंदिर परिसरात दत्तमंदिर, शनीमहाराज, मारुती, मच्छींद्रनाथ, गोरक्षनाथ, नारदमुनी, मार्कंडेय मुनी, सिद्धेश्र्वर, पार्वती, गणेश व कार्तिकस्वामी अशी स्थाने आहेत. श्री दत्तमंदिराच्या बाजूसच श्रीकिसनगिरी महाराजांची समाधी स्थान आहे. येथील महाद्वारच मंदिराचे भव्य दिव्य स्वरूपाची कल्पना देते. येथील गोपुरे अत्यंत सुंदर आहेत.


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

Leave a Comment

Your email address will not be published.