श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी

श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी

श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्र- २२२ वर माजलगाव-गेवराई दरम्यानच्या सावरगाव पासून १० कि.मी.अंतरावर आहे.


श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी – इतिहास

संपुर्ण भारतात भगवान पुरूषोत्तमाचे एकमेव मंदीर तालुक्यातील क्षेत्र पुरूषोत्तमपुरी येथे आहे. हे मंदिर इसवी सन १३१० मध्ये रामचंद्र देव यादवांचा मंत्री पुरुषोत्तम याने उभारले. यामुळेच या गावाला पुरुषोत्तमपुरी हे नाव पडले. मंदिरातील मुख्य देवतेलाही याच नावाने ओळखले जाते. इतिहासाच्या दृष्टीने पुरुषोत्तमपुरीस मोठे महत्त्व असून रामचंद्र देव यादवांचा शेवटचा ज्ञात ताम्रपट इथेच सापडला आहे. आजपर्यंत उपलब्ध सर्व ताम्रपटात हा ताम्रपट वजनाने व आकारानेही मोठा मानला जातो. यात रामचंद्र देव यादवाने मंदिर उभारणीसाठी व मंदिराच्या देखरेखीसाठी पंचक्रोशीतील वृंदाना आजूबाजूची गावे दान दिल्याचा उल्लेख site आहे. पुरुषोत्तमपुरी महाराष्ट्राच्या धार्मिक जीवनात दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यात माजलगाव तालुक्यातील पुरूषोत्तमपुरीत पुरूषोत्तमाच्या दर्शनास जातात. अधिक मासात या ठिकाणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. गोदाकाठी राक्षसभूवन, पुरूषोत्तमपुरी, मंजरथ, गंगामसला येथे प्राचीन मंदिरे आहेत. त्यात पुरूषोत्तमपुरीचे मंदीर उल्लेखनीय ठरते.

श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी


श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी – वास्तु

हे मंदिर पवित्र पापनाशिनी गोदावरी तटावर पुरूषोत्तमाचे हे हेमाडपंथी मंदीर असून या मंदीराचे बांधकाम सुमारे १५०० वर्षापुर्वी झाल्याचे शिलालेख येथे आहे. या मंदीराचा कळस व बांधणी हे केदारनाथ मंदीर (उत्तराखंड) पध्दतीचे आहे व शेजारीच वरदविनायक, सहलक्षेश्वर महादेव, पार्वती पादुका मंदीर आहे व ही दोन्ही मंदीर जुनी असल्याचे दिसते. वरदविनायक मंदीर हे वृंदावनातील कृष्णमंदीराची प्रतिकृती असल्याचे दिसते.
स्तंभशीर्ष, स्तंभतळ, मंदिरावरील कोरीव दगडे व मंदिराच्या तळाच्या विविध भागातील घडीव शिळांचा समावेश आहे. या अवशेषात एका सतीची शिळा सापडली असून ती साडेतीन फूट उंच व दीड फूट रुंद आहे.


श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी – मुर्ती

मुख्य पुरूषोत्तम मंदीरातील पुरूषोत्तमाची मुर्ती ही गंडळी शिलेची असून ती स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. चतुर्थभुजाधारी पुरूषोत्तमाच्या हातात शंख, चक्र, गदा, पद्म असून मुर्ती मनमोहक अशी आहे.

श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी


उत्सव 

‘पुरुषोत्तम’ तेराव्या महिन्याचा स्वामी भारतीय संस्कृतीत धोंड्याच्या महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे.

या महिन्यात पुरूषोत्तमाला सोन्याचे, चांदीचे, पुरणाचे, पेठ्याचे धोंडे अर्पण करण्याची प्रथा आहे.

दर तीन वर्षांनी येणाऱ्या या अधिक मासाचे वर्णन धोंडे महाल या ग्रंथात असून बारा महिन्याचे बारा स्वामी असतात.

परंतू उरी-सुरीच्या तेराव्या महिन्याचा स्वामी कोण होणार ?

या वरून पुरूषोत्तमाने हे स्वामीत्व स्वीकारले व तेव्हापासून या महिन्याला

‘पुरूषोत्तम मास’ हे नाव पडल्याचा उल्लेख आढळतो.


विशेष

पुरुषोत्तमपुरी मंदिराचे स्थापत्य कलेतील वेगळेपण असे की मंदिराच्या बांधकामात वापरलेल्या विटा चक्क पाण्यावर तरंगतात. अधिकमासात सौभाग्यवती स्त्रिया येथे गोदावरीत स्नान करून पतीच्या समृध्दी व दीर्घायुष्यासाठी पुरूषोत्तमाला ३३ धोंडे अर्पण करतात व सुखाची कामना करतात. त्यामुळे या महिन्यात राज्यातून लाखो महिला या यात्रेत सहभागी होत असतात.

लीखिका : वेदिका जोशी


कृषी क्रांती

श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी

2 thoughts on “श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी”

  1. kupach sundar Apratim very nice zakas 1nambar khupach mahtv aye. pawan Bhumi. chayanch watle.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *