रामेश्वर मंदिर कायगाव टोका

रामेश्वर मंदिर कायगाव टोका

माहिती विडिओ स्वरूपात पहा.


रामेश्वर मंदिर, जुने कायगाव, औरंगाबाद (kaigaon toka )

नगर – औरंगाबाद महामार्गावर दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर, गोदावरी-प्रवरा संगम तीरावर प्राचीन रामेश्वर मंदिर आहे. या मंदीराची कथा थोडक्यात अशी की, कांचन मृगाचा पाठलाग करत असताना प्रभू रामचंद्र सध्याच्या अहमदनगर – औरंगाबाद जिल्ह्यांच्या वेशीजवळील गोदावरी – प्रवरा संगमावर येतात इथे प्रभू रामचंद्र कांचन मृगाचे शीर धडा वेगळे करतात. मृगाचे शीर जेथे पडले ते स्थान सध्या टोका म्हणवले जाते, तर धड जेथे पडले ते स्थान कायगाव असे मानतात. या दोन्ही गावात महादेवाची अनेक सुंदर मंदीरे आहेत. त्यातीलच हे कायगावातील एक रामेश्वर मंदिर होय.

प्रभू रामचंद्रांनी या मंदिरातील शिवलिंगाची स्वहस्ते स्थापना केली असल्याचे मानले जाते. मंदिराची रचना अर्ध मंडप, सभामंडप व गर्भगृह अशी साधारण असली तरी डोळ्यात भरणारी आहे. मंदिर लहान असले तरी त्याची शिल्पकला पाहणाऱ्याला नक्कीच आकर्षित करते. दशक्रिया विधीसाठी हे स्थान खूप पवित्र मानले जाते. औरंगाबाद, अहमदनगर, पुणे आदी जिल्ह्यातून लोक दशक्रिया विधीसाठी येथे येतात.

(Rameshwer mandir kaygaon toka )


रामेश्वर मंदिर कायगाव टोका माहिती समाप्त   (kaygaon toka information in marathi)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *