श्री क्षेत्र कोळंबी, दत्त ब्रम्हयंत्र मंदिर

श्री क्षेत्र कोळंबी, दत्त ब्रम्हयंत्र मंदिर

श्री क्षेत्र कोळंबी, दत्त ब्रम्हयंत्र मंदिर

स्थान: कोळंबी, तालुका नारायणगाव, जिल्हा नांदेड
त्पुरुष: शिवबक्ष योगी
विशेष: श्री दत्त महाराज व अनुसुयामाता मूर्ती, ब्रह्मयंत्र

मराठवाडा जसा मंदिर स्थापत्याच्या दृष्टीने संपन्न आहे तसाच तो अनेक वैशिष्टय़पूर्ण गोष्टींनी पण नटला आहे. कोळंबीचे दत्त मंदिर हे पण त्यातलेच एक वैशिष्टय़ होय. हे अनेक वैशिष्ष्ठ पूर्ण गोष्टींनी नटलेले दत्तमंदिर आहे.

श्री दत्त ब्रह्मयंत्र, कोळंबी

सदर दत्तमंदिर नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नांदेड देगलूर मार्गावर कहालापासून अंदाजे ८ कि. मी. कोळंबी हे गाव आहे. या गावाच्या पूर्वेला एक मठ आहे. तो मठ म्हणजेच इथले दत्त संस्थान आहे. इथले वैशिष्ठ म्हणजे दत्तमहाराजांची प्रतिमा आहे सोबतच माता अनुसयेची मूर्तीपण आहे. पण त्याबरोबरच एका पाषाणावर कोरलेल्या ब्रह्म यंत्राची प्रतिष्ठापना सुद्धा केलेली दिसते. याला श्रीयंत्र असेही म्हणतात. या ब्रह्म यंत्रावर विविध प्रकारची चिन्हे कोरलेली आढळतात. एकूणच अशी ब्रम्हयंत्रे खूपच कमी आढळतात. नेपाळ, काशी, श्रींगेरी आणि कोळंबी अशा ठिकाणी अशी यंत्रे असल्याचे दिसते. यापैकी काशी येथील हे यंत्र मॅक्समुुलर स्वतःबरोबर इंग्लंडला घेऊन गेला.
शिवबक्ष नावाचे एक योग्याने आपल्या योगविद्येच्या आणि सामरा शास्त्राच्या साहाय्याने हे यंत्र शोधून काढले व त्याची कोळंबी येथील मठात स्थापना केली असे येथे सांगितले जाते.

कार्तिक पौर्णिमेला येथे ३ दिवसाचा मोठा उत्सव होतो. पहिल्या दिवशी अन्नपूजा, दुसरे दिवशी महापूजा व तिसरे दिवशी पालखी व चौथेदिवशी कला असा भरगच्च कार्यक्रम असतो. ब्रह्मयंत्रास प्रथम पंचामृत स्नान घालून, त्यावर तांदुळाची रास रचतात. राशीतील तांदूळावर यंत्रा प्रमाणे चिन्हे काढतात. हा सोहळा मोठा प्रेक्षणीय असतो मंदिराच्या पूजेची व्यवस्था माठाधीश महंतांकडे असते. हा माठाधीश महंत ब्रम्हचारी असावा लागतो.
अनेक संकटात असलेल्या, खचलेल्या, पिचलेल्या लोकांना हे देवस्थान एक संजीवनीच वाटते. अनेकांची दुःख यातना भोग, यातना येथे आल्यावरच संपतात अशी भक्तांची नितांत श्रद्धा आहे. येथे “देवदत्त गुरुदत्त” असा नामघोष सतत केला जातो.
असे हे स्थान अगम्य तर आहेच पण सर्व भक्तांच्या कामना पूर्ण करणारा कल्पतरुच होय !
।। देवदत्त गुरुदत्त ।।


श्री क्षेत्र कोळंबी, दत्त ब्रम्हयंत्र मंदिर माहिती समाप्त


संक्षिप्त श्री गुरुचरित्र विकत घेण्यासाठी संपर्क करा  :७२१८२७४९७४

1 thought on “श्री क्षेत्र कोळंबी, दत्त ब्रम्हयंत्र मंदिर”

  1. purushottam krushnoorkar

    very nice info.
    श्रीगुरुदेव दत्त
    pl make a small correction
    ता नारायणगाव×
    ता नायगाव√

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *