श्रीराम मंदिर रामटेक

श्रीराम मंदिर रामटेक – shriram mandir ramtek

श्रीराम मंदिर रामटेक

रामटेक हे नागपूर जिल्ह्यातील पवित्र व निर्गरम्य स्थान आहे. हे नागपूरच्या ईशान्येस रस्त्याने ५५ कि. मी. अंतरावर आहे. नागपूर-जबलपूर या राष्ट्रीय महामार्गावरील मनसर या ठिकाणाहून येथे रस्ता जातो. नागपूरशी हे लोहमार्गानिही जोडलेले असून अंबागड टेकड्यांच्या पायथ्याशी आहे.

रामटेक या १५२ मी. उंचीवर असलेल्या टेकडीवर चौदाव्या शतकातील बरीच मंदिरे आहेत. या रामटेक टेकाडीची दक्षिण व पश्चिम बाजू नैसर्गिकरीत्याच संरक्षित आहे. उत्तरेकडे दुहेरी भिंत बांधून तटबंदी केली आहे. बाहेरील भिंत आधीच्या गवळी राजांनी बांधली असावी; तर इतर काम नंतरचे आहे. देऊन पश्चिमेकडच्या सर्वात उंच भागात असून अंबाला तलावाच्या पश्चिम टोकाकडून टेकडीवर चढण्यास पायन्या आहेत. वर पोहोचल्यावर दगडी भिंत असलेल एक जुने तळे आहे. च नरसिंहाची मोठी मूर्ती असलेले देऊळही आहे. या टेकडीला प्यारी बाजूनी कोट असून ज्याला अनुकरो वराह, भैरव, सिंगपूर आणि गोकुळ असे चार दरवाजे आहेत.

नागपूरचा रजी पहिला यांच्या हातून देवळाच्या बाहेरच्या मजबूत तटबंदीचे काम झाले मुख दरवाजा वराह दरवाना कारण लगेच आत बस या विष्णुच्या अवताराचीमोठी मूर्ती आहे. त्यापलीकडे आणखी तीन दरवाजे आहेत. सिंधपूर दरवाजा या रेषेतील दुसरा दरवाजा असून त्यातून आतल्या तटबंदीत प्रवेश मिळतो तर भैरव दरवाजातून आतल्या शेवटच्या तटबंदीत प्रवेश मिळतो. आत राजा दशरथ व वसिष्ठ गुनी यांची देवळे आहेत. लक्ष्मणाचे मंदिर समोरच आहे व त्यासमोर राम व सीतेचे मोठे देऊळ उभे दिसते. मुख्य वास्तूच्या सभोवार इतर अनेक देवतांची मंदिरे आहेत.

नागपुरची खास वास्तुती गरेकी दिसून येते. उत्तर व पूर्वेकडील भिंती, शिखरे, उपशिखरे, कलश व खांबाच्या बांधणीचे बारकावे य वास्तूत मोचर होतात. छोट्या छत्र्या, उसका कमलकळीची नक्षी, जाळीदार खिडक्या, सब्जे व उथळ देवळ्या यांमुळे देवळावर उजेड व सावल्यांचा नयनमनोहर खेळ दिसतो. शिखरे भूमि प्रकारची आहेत.

हे मंदिर सुमारे ७०० वर्षे जुने आहे. भक्तगण प्रथम येथील धूवर महादेवाचे दर्शन घेऊनव श्रीराम मंदिरात दर्शनास जातात.

या राममंदिरात राम-सीता यांच्या काळ्या दगडातील, वनवासी वेषातील रम्य मूर्ती आहेत. त्या दुधाळे तलावात मिळाल्याचे म्हटले जाते. या मंदिरासमोरच लक्ष्मणाचेही मंदिर असून, गोकुळ दरवाजा व लक्ष्णण मंदिर यांवरील कोरीव काम विशेष लक्षणीय आहे. यांव्यतिरिक्त अन्य काही मंदिरेही आवारात आहेत.

मंदिरासमोरच एक कुंड असून, ते सीतेची न्हाणी म्हणून ओळखले जाते. टेकडीच्या पायथ्याशी एक जुने कल्की अवताराचे (दशावतारातील दहावा अवतार) मंदिर व मध्ययुगीन नागर शैलीत बांधलेली काही जैन मंदिरे आहेत.

राम मंदिर परिसरातच एक विशाल नंदी आहे व श्रीगणेशाचे पुरातन मंदिर आहे. येथे श्रीरामाचे नागण म्हणजे वानरांचा मुक्त संचार आहे. नागपूरकर भोसल्यांच्या खास शस्त्रांचासाठा या मंदिरात आहे.

संस्कृतच्या अभ्यासाकरिता स्थापन करण्यात आलेले कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे मुख्यालय येथे आहे.

रामटेकमध्ये माणिकवाल व मथुरासागर अशा दोन बागा आणि २७ तलाव असून त्यांपकी अंबाला तलाव सर्वांत मोठा आहे. या तलावाच्या काठावर आधुनिक पद्धतीने बांधलेली अनेक प्रेक्षणीय देवालये असून सकाळच्या प्रहरी या देवालयांवर सूर्यकिरणे पडून चमकू लागली म्हणजे तलाव व देवालये यांचे एकंदर दृश्य अतिशय मनोहारी बनते. या मंदिरामध्ये एक अप्रतिम सूर्य मंदिरही आहे. अंबाला तलावावर एकूण आठ घाट बांधण्यात आले असून त्यांना अष्टतीर्थांची नावे देण्यात आली आहेत.येथे नरसिंहाने हिरण्याकरता मारते अतीक आहे.

सण व उत्सव :

रामटेक श्रीराम मंदिर येथे रामनवमी व त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी मोठ्या जत्रा भरतात. या मंदिरात कार्तिक महिन्यात येणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमा यात्रा भरते. त्या रात्री १२ वाजता उंच कळसावर त्रिपुरः प्रज्वलित केला जातो. ही त्रिपुरारी पौर्णिमेची व रामनवमीची जत्रा १२ व्या शतकातही ही भरत असे असा उल्लेख लीळा चरित्र ग्रंथात आला आहे. रामाच्या देवळावर त्रिपूरात त्रिपुरासुराच्या शंकराने केलेल्या संहाराची निदर्शक आहे. या जत भांडी, खाद्यपदार्थ, शोभेच्या वस्तू विक्रीस असतात.

सितामाता रसोई घर गडमंदिर रामटेक :

सितामाता रसोई घर गडमंदिर रामटेक येथे मंदिर संस्थानामार्फत दर शनिवारी आणि रविवारी उन्हाळ्यात सकाळी ९:३० ते दुपारी १२.३० पर्यंत व इतर ऋतूंमध्ये सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपावेतो निशुल्क भोजन देण्यात येते.

एकूण मराठी देवळाची बांधणी व वास्तुकला यांवर येथील हवापाणी, डोंगरदऱ्या व धार्मिक वापर यांचा परिणाम येथे दिसून येतो. विशेषत वारकरी सांप्रदायाचा मोठा पगडाच या वास्तुकलेवर आहे. भक्तिमार्गामुळे अनेक नाव यात्रांच्या प्रथा आजतागायत रामटेकसह उभ्या महाराष्ट्रात चालू आहेत.

रामटेक या नावाचा इतिहास व या मंदिराला व टेकडीला दिली गेलेली ईतर नावे

रामटेक म्हणजे रामाची टेकडी रामाने बनवासकाळात या टेकडीवर काही काळ विश्रांती घेतली म्हणून पास रामटेक नाव पडले, असेही म्हटले जाते. या टेकडीवर विष् हिरण्यकश्यपूचा वध केला व त्याच्या रक्ताने येथील दगड तांबडे झाले म्हणून यास ‘सिंदुरगिरी’ असेही नाव पडले आहे. ‘रामगिरी’, ‘तापोगिरी’, ‘काशीचे महाद्वार’ असेही याचे उल्लेख आहेत. “सिंदुरगिरी’ व ‘तपोगिरी’ ही दोन्ही नावे पीस लक्ष्मण मंदिरावरील कोरलेल्या एका यादवकालीन शिलालेखात (तेरावे शतक) आढळतात.

रामटेकच्या दक्षिणेला वाकाटककालीन नगरधन चा किल्ला आहे.

रामटेकचा इतिहास

इ.स.२५० मध्ये रामटेकचा परिसर मोर्ग शासकांच्या अधिपत्याखाली होता. सातवाहनांच्या कालात प्रवरपूर (सध्याचे मनसर) हे एक महत्त्वाचे ठिकाण होते. इ.स. ३५० मध्ये त्यांचा पडाव करून वाकाटकांनी सत्ता काबीज केली. त्याच काळात कालिदास झाले असा समज आहे. संस्कृत कामातील एक अभिजात कलाकृती कविकुलगुरु कालिदासाने हे काव्य याच रामटेक परिसरात लिहिले आहे. सन १९७०-१९७१ मध्ये, रामटेक मडमंदिर परिसरात, महाराष्ट्र शासनाने ‘कालिदास स्मारकाची’ निर्मिती केली. आज या कालिदासांच्या नावाने येथे संस्कृत विद्यापीठ सुरू आहे. या ठिकाणी दरवर्षी ‘कालिदास महोत्सव साजरा होत असतो. रामटेकच्या दक्षिणेला असलेला वाकाटककालीन नगरपन वा किल्ला हा वाकाटकांची राजधानी होता.

रामटे तालुक्यात १८६७ साली नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. तीर्थक्षेत्राखेरीज आसमंतीय मँगेनीजच्या खाणी यांमुळे रामटेकला विशेष महत्व आले आहे. येथील पानमळे प्रसिद्ध असून ही पाने पुण्या-मुंबईला निर्यात होतात. रामटेक जवळच तोतलाडोह हे चरण आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *