टेकडी गणपती मंदिर नागपूर

टेकडी गणपती मंदिर नागपूर – tekadi ganpati mandir nagpur

नागपूरचे टेकडी गणपती मंदिर 

विदर्भाच्या अष्टविनायकातील पहिला मजला जातो, तो नागपूरचा टेकडी गणेश, नागपूरकरांचे हे आराध्य देवत आहे. नागपूर रेल्वे स्थानकाला लागून सीताबर्डी टेकडीवर हे गणेशाचे मंदिर आहे. हे मंदिर टेकडीवर बांधण्यात आले असल्याने त्याला टेकडी गणपती मंदिर असे म्हटले जाते. नागपूरचे राजे भोसले यांनी हे मंदिर सुमारे अठराव्या शतकांत बांधले असून, ते सुमारे २५० वर्षे जुने असल्याचे समजते.

भोसले राजे आणि ब्रिटिशांची लढाई ज्या ठिकाणी झाली, त्याच ठिकाणी हे गणपतीचे मंदिर आहे. सुरुवातीला मंदिर छोटेसे होते, आता त्याचा विकास झाला आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला असले, तरी मूर्ती उत्तराभिमुख आहे. गणपतीच्या मूर्तीच्या पाठीमागील भिंतीला लागून एक शिवलिंग आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगाच्या ठिकाणी नदी बसवलेला दिसतो.

याच टेकडीवर दुसऱ्या भागात आणखी एक गणपती मंदिर आहे. तो फोजी गणपती म्हणून ओळखला जातो. शुक्रवार तलावाचे पाणी पूर्वी सीताबर्डी किल्ल्यापर्यंत होते. भोसले राजे नावेतून तेथे गणेश दर्शनासाठी येत असे सांगितले जाते. येथील गणेशमूर्ती भोकरीच्या झाडाखाली उघडयावर होती. या ठिकाणी पूर्वी मोठे मंदिर होते; परंतु नंतर ते उद्ध्वस्त झाले.

त्याचे अवशेष आजही दिसतात, मंदिराच्या आसपास वह पिपळाची झाडे आहेत. ही मूर्ती उजव्या गोडची असून दोन पाय, चार हात, डोके, सोड पूर्वी स्पष्ट दिसत असे. आता शेंदराच्या पुरामुळे मूर्ती स्पष्ट दिसत नाही. या बैठ्या मूर्तीची उंची साडेचार फूट व रुंदी तीन फूट आहे. मूर्तीच्या मागे पिंपळाचे झाड आहे. त्याच्या मुळांमुळे मूर्ती मूळ जागेहून थोडी पुढे सरकली असावी, असा तर्क आहे.

ला, क्रीडा क्षेत्रातील नामवंत या मंदिरात दर्शनासाठी येतात, तिन्ही चतुर्थीला येगे भाविकांची मोठी गर्दी होते. मंदिराच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *