योगेश्वरी देवी

योगेश्वरी देवी

इतिहास – महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात जयंती नदीच्या काठी वसलेले एक गाव म्हणजे अंबेजोगाई. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहुरची रेणुका ही आदिशक्तीची पूर्ण पीठे, तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे पीठ. काही लोकांच्या मते अंबेजोगाईची योगेश्वरी, हे अर्धे पीठ. मराठीचे आद्य कवी, ‘विवेकसिंधु’कर्ते मुकुंदराज आणि दासोपंतांचा अधिवास लाभलेले हे स्थान.

वास्तू – अंबेजोगाई येथील योगेश्वरी देवीचे भव्य मंदिर पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. या मंदिराची रचना हेमाडपंती स्थापत्यशैलीची असून मंदिर उत्तराभिमुख आहे. देवळास चहू दिशेस महाद्वार आहेत. मंदिराचे बांधकाम व त्यावरील शिल्पाकृती पाहून मन थक्क होते. दगडी खांब व तुळयांवरील बारीक नक्षीकाम अतिशय रेखीव आहे. उत्तर महाद्वाराच्या बाहेर लगोलग सर्वेश्वर तीर्थ आहे. मंदिराच्या परिसरात काही सत्पुरूषांच्या समाध्या आहेत. पश्चिम दरवाजाला लागूनही अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत

योगेश्वरी देवी

योगेश्वरी नाव कसे पडले –
योगिनी हृद्यदिपिकेत योगिनीचे वर्णन खालीलप्रमाणे केले आहे.
पार्वतीच्या शक्ती अंशाने उत्पन्न झाल्यावर जगताला प्रकाशभूत होणाऱ्या आणि ब्रम्हा, विष्णु, महेश आणि देवता यांच्या मध्ये अंतर्भुत असलेल्या लहान मोठ्या पंचभौतिक परमाणुयुक्त चैतन्य शक्तीला योगिनी असे संबोधतात. योगीनीमध्ये प्रमुख किंवा योगिनीच्यावर अधिपत्य करणारी देवता ती योगेश्वरी होय. या प्रमाणे योग साधनेला प्राधान्य देणारी देवी म्हणून योगेश्वरी नाव प्रचारात आले असावे.

देवी योगेश्वरी हे साक्षात आदिमाया आदिशक्तीने घेतलेले रूप. ही देवी अंबाजोगाई येथे वास्तव्यास आहे. दंतासूर नावच्या एका राक्षसाने प्रचंड उन्माद माजवला होता. त्याचा वध करण्यासाठी देवीने योगेश्वरीचे रूप घेतले आणि त्याचे पारिपत्य केले.

मुर्ती- अमूर्त अनघड अशा तांदळ्याच्या रूपातली ही योगेश्वरी कुमारिका आहे. त्यामागे एक कथा सांगितली जाते, परळीच्या वैजनाथांचा योगेश्वरीशी विवाह निश्चित करण्यात आला. लग्नाचा मुहूर्त ठरला; पण तो मुहूर्त टळून गेला आणि देवीचा विवाह झाला नाही. यामुळे देवी कुमारिकाच राहिली आणि परत कोकणात न जाता, देवी ज्या ठिकाणी राहिली, ते आजचे आंबाजोगाई. ११व्या शतकाच्या सुमारास कोरल्या गेलेल्या हत्तीखाना लेणी किंवा शिवलेणी, हे जोगाईचे माहेर म्हणून ओळखू जाऊ लागले.

उत्सव – देवीला रोज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, तसेच तांबुलाचाही प्रसाद असतो. देवीचा मुख्य उत्सव हा मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला, म्हणजेच दत्त जयंतीला साजरा केला जातो. अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र उत्सवही तितक्याच मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते.

विशेष – इतर शक्तीपिठाच्या ठिकाणी असलेल्या कोणत्याही देवीच्या हातात तिच्या भक्तांनी स्वीकार केलेले हे आयुध (पात्र) दिसून येत नाही. योगेश्वरी देवीचे हे एक वैशिष्ट्य मुद्दाम उल्लेख करण्यासारखे आहे. योग साधनेत मग्न असलेल्या या देवीने हे चिन्ह धारण करणे योग्यच आहे आणि भक्तांनी सुद्धा आपले आयुष्य अशाच प्रकारे योग साधनेत घालवावे असा त्यांचा उद्देश असावा.अशी नवसाला पावणारी कुलस्वामिनी आहे.

लेखिका – वेदिका जोशी

krushikranti

2 thoughts on “योगेश्वरी देवी”

  1. दिलीपकुमार हरी फडके

    योगेश्वरी देवीचं मूळ स्थान कोकणात राजापूर तालुक्यातील आडिवरे येथे असावे. तेथील महाकाली मंदिरात महाकाली च्या मूर्ती शेजारी थोडी लहान योगेश्वरी देवीची मूर्ती आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *