संत तुकाराम अभंग

काय काशी करिती गंगा – संत तुकाराम अभंग – 112

काय काशी करिती गंगा – संत  तुकाराम अभंग – 112


काय काशी करिती गंगा ।
भीतरिं चांगा नाहीं तो ॥१॥
अधणीं कुचर बाहेर तैसा ।
नये रसा पाकासि ॥ध्रु.॥
काय टिळे करिती माळा ।
भाव खळा नाहीं त्या ॥२॥
तुका म्हणे प्रेमें विण ।
अवघा शीण बोले भुंके ॥३॥

अर्थ
ज्याचे अंत:करण शुद्ध नाही त्याने काशिक्षेत्र, गंगाजल केले तरी त्याचा काय उपयोग ? एखादा कुचर दाणा पाकात टाकला तरी तो शिजत नाही .ज्याच्या मनामधे भक्तिभाव नाही, त्याने कपाळि गंधटिळा, गळ्यात तुळशिचि माळ घातली तरी त्याचा काय उपयोग ? .तुकाराम महाराज म्हणतात, की ज्याच्या मनात शुद्ध भक्तिभाव नाही, त्याचे बोलने कुत्र्याच्या भुकण्यासारखे व्यर्थ आहे .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


काय काशी करिती गंगा – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *