संत तुकाराम अभंग

अनुसरे तो अमर झाला – संत तुकाराम अभंग – 114

अनुसरे तो अमर झाला – संत तुकाराम अभंग – 114


अनुसरे तो अमर झाला ।
अंतरला संसारा ॥१॥
न देखती गर्भवास ।
कधीं दास विष्णूचे ॥ध्रु.॥
विसंभेना माता बाळा ।
तैसा लळा पाळावा ॥२॥
त्रिभुवनीं ज्याची सत्ता ।
तो रक्षीता जालिया ॥३॥

अर्थ
जो हरी चरणाशी अनुसरून राहतो तो अमर होऊन त्याचे संसारबंधन तुटते.विष्णू दासांना कधी पुनर्जन्म म्हणजे गर्भवास नसते.ज्या प्रमणे माता बाळाला विसंबत नाही त्याप्रमाणे देव भक्तांचे लाड पुरवतो.तुकाराम महाराज म्हणतात ज्याची त्रिभुवनात सत्ता आहे असा भगवंत त्याच्या भक्तांचे रक्षण करतो.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


अनुसरे तो अमर झाला – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *