संत तुकाराम अभंग

सांपडला संदीं – संत तुकाराम अभंग – 123

सांपडला संदीं – संत तुकाराम अभंग – 123


सांपडला संदीं ।
मग बळिया पडे बंदीं ॥१॥
ऐसी कोणी वाहे वेळ ।
हातीं काळाच्या सकळ ॥ध्रु.॥
दाता मागे दान ।
जाय याचका शरण ॥२॥
तुका म्हणे नेणां ।
काय सांगों नारायणा ॥३॥

अर्थ
एखादा सामर्थ्यवान मनुष्य संकटात सापडला की पेचात अडकतो . त्या वेळी तो काळाच्या हाती सापडल्याने त्याचे काही चालत नाही . एखादी दानशूर व्यक्ती सुद्धा वेळ आल्यावर भीक मागु लागते .तुकाराम महाराज म्हणतात, ही काळाची गति त्या नारायणाला काय सांगावे ? त्यानेच ती निर्माण केली आहे .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


सांपडला संदीं – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *