संत तुकाराम अभंग

सर्प विंचू दिसे – संत तुकाराम अभंग – 124

सर्प विंचू दिसे – संत तुकाराम अभंग – 124


सर्प विंचू दिसे ।
धन अभाग्या कोळसे ॥१॥
आला डोळ्यांसि कवळ ।
तेणें मळलें उजळ ॥ध्रु.॥
अंगाचे भोंवडी ।
भोय झाड फिरती धोंडी ॥२॥
तुका म्हणे नाड ।
पाप ठाके हिता आड ॥३॥

अर्थ
पूर्वजांणी पुरावुन ठेवलेले गुप्तधन एखाद्या पापी मनुष्याच्या हाती आल्यावर त्यामध्ये त्याला सर्प, विंचु, कोळसे दिसतात .जसे काविळ झालेल्या मनुष्याला सर्व वास्तु या पिवळ्याच दिसतात .आपल्याच शरीरा भोवती गोल-गोल फिरल्यास भोवतालचि झाडे, दागडधोंडेही गोल फिरताना आढळतात व् घेरी येते .तुकाराम महाराज म्हणतात , पूर्वी केलेले पाप आपल्या हिताच्या आडवे येते .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


सर्प विंचू दिसे – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *