न संडवे अन्न – संत तुकाराम अभंग – 362
न संडवे अन्न ।
मज न सेववे वन ॥१॥
म्हणउनी नारायणा ।
कींव भाकितों करुणा ॥ध्रु.॥
नाहीं अधिकार ।
कांहीं घोकाया अक्षर ॥२॥
तुका म्हणे थोडें ।
आयुष्य अवघेंचि कोडें ॥३॥
अर्थ
अन्नाचा त्याग करणे व वैराग्याने वनात जाऊन राहणे हे मला शक्य होत नाही.म्हणून हे नारायणा मी तुला अति करून तेणे तुला शरण आलो आहे.वेदाअक्षरं पठण करण्याचा अधिकार मला नाही.तुकाराम महाराज म्हणतात देवा आयुष्य थोडे आहे आणि अडचणी फार आहेत.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.