संत तुकाराम अभंग

वचनें ही नाड – संत तुकाराम अभंग – 364

वचनें ही नाड – संत तुकाराम अभंग – 364


वचनें ही नाड ।
न बोले तें मुकें खोड ॥१॥
दोहीं वेगळें तें हित ।
बोली अबोलणी नीत ॥ध्रु.॥
अंधार प्रकाशी ।
जाय दिवस पावे निशी ॥२॥
बीज पृथिवीच्या पोटीं ।
तुका म्हणे दावी दृष्टी ॥३॥

अर्थ

ज्यादा बोलणे हे हि चांगले नाही व कमी बोलणे हे चांगले नाही कारण ज्यादा बोलल्यावर लोक त्याला वाचाळ म्हणतात व न बोलल्यास लोक त्याला मुका म्हणतात.म्हणून या पेक्षा भिन्न जे आपले स्वरुपबोध यातून बोलणे हे योग्य.सकाळी सूर्योदयाच्या आगोदरचा अंधार व संध्याकाळी सूर्‍यास्ताच्या अगोदर चा अंधार हे दोन्ही सारखेचतसे मौन आणि बोलने हे एकमेकांत अशाप्रकारे जाते.तुकाराम महाराज म्हणतात बीज पृथ्वीच्या पोटात असते व त्यापासून वृक्षाची निर्मिती होते पण बीज आणि वृक्ष या दोघांमध्ये पृथ्वी समान आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play


झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *