संत तुकाराम अभंग

शुद्धबीजा पोटीं – संत तुकाराम अभंग – 37

शुद्धबीजा पोटीं – संत तुकाराम अभंग – 37


शुद्धबीजा पोटीं ।
फळें रसाळ गोमटीं ॥१॥
मुखीं अमृताची वाणी ।
देह देवाचे कारणीं ॥ध्रु.॥
सर्वांग निर्मळ ।
चित्त जैसें गंगाजळ ॥२॥
तुका म्हणे जाती ।
ताप दर्शनें विश्रांती ॥३॥

अर्थ
बिज शुद्ध असले तर येणारे फळ पण उत्तम उपजते .ज्याच्या मुखी हरिणामामृत असते, त्या मधुर वाणीमुळे त्याचा देह सत्कारणी लागतो .जो देह-चित्त-बुद्धिने निर्मळ आहे, त्याचे चित्त गंगाजलाप्रमाने पवित्र असते.तुकाराम महाराज म्हणतात, अशा संतांच्या दर्शनाने त्रिविध ताप नष्ट होतात आणी जीव विसावा घेतो.

(Meaning In English :- If the seed is pure, then the fruit that comes is also good. The one whose mouth is deer-dead, his sweet voice makes his body hospitable. He whose body-mind-intellect is pure, his mind is as pure as Gangajala The soul rests.)


हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .


शुद्धबीजा पोटीं – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *