संत तुकाराम अभंग

चित्त समाधान – संत तुकाराम अभंग – 38

चित्त समाधान – संत तुकाराम अभंग – 38


चित्त समाधान ।
तरी विष वाटे सोनें ॥१॥
बहु खोटा अतिशय ।
जाणां भले सांगों काय ॥ध्रु.॥
मनाच्या तळमळें ।
चंदनें ही अंग पोळे ॥२॥
तुका म्हणे दुजा ।
उपचार पीडा पूजा ॥३॥

अर्थ
चित्त समाधानी असेल तर सोने सुध्दा विषासमान भासते .विषयलोलुपता जीवनाला घातक ठरते, तुम्ही विचारी गृहस्थ हे सर्व काहि जाणता.मनामध्ये प्रपंच्याविषयीची भोगलालसा असेल तर शरीराचा दाह चंदनाच्या उटिनेही कमी होत नाही .तुकाराम महाराज म्हणतात, प्रपंच्याविषयी आसक्ती असलेल्या माणसाला कितीही मिळाले तरि तो मनुष्य असंतृष्ट राहतो.

(Meaning In English :- If the mind is satisfied, then gold also seems to be poisonous. .Lustfulness is dangerous to life, you are a householder, you know all about it.If there is lust in the mind for Prapancha, then the burning of the body is not reduced even with sandalwood uttani.Tukaram Maharaj says, no matter how much a person who is attached to the world gets, he remains dissatisfied.)


हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .


चित्त समाधान – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *