संत तुकाराम अभंग

माझी पाठ करा कवी – संत तुकाराम अभंग – 54

माझी पाठ करा कवी – संत तुकाराम अभंग – 54


माझी पाठ करा कवी ।
उट लावी दारोदार ॥१॥
तंव तया पारखी सिव ।
लाजे ठाव सांडितां ॥ध्रु.॥
उष्टावळी करूनि जमा ।
कुंथुनि प्रेमा आणितसे ॥२॥
तुका म्हणे बाहेरमुदी ।
आहाच गोविंदीं न सरती ॥३॥

अर्थ
आपल्या काव्यात काव्यगुण नसतांना कहीजण कविता रचतात आणि माझी कविता पाठ करा असे दरोदारी जाउन लोकांनां सांगतात .जे जाणकार आहेत, ते त्यांची योग्य पारख करतात मग तेथून जातांना त्या स्वत:ला कवी म्हणावणारर्‍याची मान लाजेने खाली जाते .उष्ठावळी जमा करुण बळेच प्रेमाचे आव आणतात .तुकाराम महाराज म्हणतात अश्या वरकर्णि भगवंतभक्तिचा देखावा करणारे भगवंत चरणी लीन होत नाहीत.


हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .


माझी पाठ करा कवी – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *