sarth tukaram gatha

आहे तरिं सत्ता – संत तुकाराम अभंग – 619

आहे तरिं सत्ता – संत तुकाराम अभंग – 619


आहे तरिं सत्ता । ऐशा करितों वारता ॥१॥
अंगसंगाचीं उत्तरें । सलगीं सेवन लेंकुरें ॥ध्रु.॥
तरो निकटवासें । असों अशंकेच्या नासें ॥२॥
तुका म्हणे रुची । येथें भिन्नता कैची ॥३॥

अर्थ

माझा तुझ्यावर हक्क आहे.म्हणून मी असे शब्द बोलतो.आंम्ही भक्त म्हणजे तुझी छोटी बालके आहोत.याच करणा मुळे आमचे बोलणे सलगीचे आहे.कोणतीही शंका न धरता आम्ही तुझ्या जवळ राहू. तुकाराम महाराज म्हणतात हरी विषयी मला ऐवढी गोडी लागली आहे की,आता कसली भिन्नता मनात येणार?


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

आहे तरिं सत्ता – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *