संत तुकाराम अभंग

आतां तरी पुढें हाचि उपदेश – संत तुकाराम अभंग – 76

आतां तरी पुढें हाचि उपदेश – संत तुकाराम अभंग – 76


आतां तरी पुढें हाचि उपदेश ।
नका करूं नाश आयुष्याचा ॥१॥
सकळांच्या पायां माझें दंडवत ।
आपुलालें चित्त शुद्ध करा ॥ध्रु.॥
हित तें करावे देवाचें चिंतन ।
करूनियां मन एकविध ॥२॥
तुका म्हणे लाभ होय तो व्यापार ।
करा काय फार शिकवावें ॥३॥

अर्थ
तुकाराम महाराज प्रापंचिक मनुष्याला विनऊन सांगता, की या आयुष्याचा स्व:ताच्या हाताने नाश करू नका .या जीवनाचे सार्थक करण्यासाठी आपले चित्त शुद्ध ठेवा; या साठी ते सर्वांना दंडवत घालून विनंती करतात .एकाग्र मन करुण भगवंतचे चिंतन करा .तुकाराम महाराज म्हणतात की जीवनाचे, नरदेहाचे सार्थक होईल असा व्यापार करा .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


आतां तरी पुढें हाचि उपदेश – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *