संत तुकाराम अभंग

भक्ताविण देवा – संत तुकाराम अभंग – 77

भक्ताविण देवा – संत तुकाराम अभंग – 77


भक्ताविण देवा ।
कैंचें रूप घडे सेवा ॥१॥
शोभविलें येर येरां ।
सोनें एके ठायीं हिरा ॥ध्रु.॥
देवाविण भक्ता ।
कोण देता निष्कामता ॥२॥
तुका म्हणे बाळ ।
माता जैसें स्नेहजाळ ॥३॥

अर्थ
भक्तावाचुन देवाची सगुण भक्ती कोण करेल? भक्तामुळे भगवंताला महत्व प्राप्त होते .हीरा सोन्याच्या कोंदनातच शोभून दिसतो तसा भक्त व भगवंताचा परस्पर संबंध आहे .देवाशिवाय भक्ताला निष्कामभक्ती शिकविणारा कोणी नाही . तुकाराम महाराज म्हणतात की, आई आणि मुलाचा जसे प्रेमाचे नाते असते त्याप्रमाणे देव व भक्त यांचे नाते आहे .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


भक्ताविण देवा – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *