अनुभवें वदे वाणी – सार्थ तुकाराम गाथा 1579
अनुभवें वदे वाणी । अंतर ध्यानीं आपुलें ॥१॥
कैंची चिका दुधचवी । जरी दावी पांढरें ॥ध्रु.॥
जातीऐसा दावी रंग । बहु जग या नाव ॥२॥
तुका म्हणे खद्योत ते । ढुंगाभोंवतें आपुलिया ॥३॥
अर्थ
मी जे काही बोलत आहे ते माझ्या अंतरंगातील ध्यान आहे आणि त्याच्याच अनुभवाने मी बोलत आहे. अंतरंगातून आलेला अनुभव आणि नुसता वरवरचे शाब्दिक ज्ञान यामध्ये फरक आहे म्हणजे नुकतीच व्यालेली गाय तिच्या सुरवातीला स्तनातून निघलेला चीक आणि नंतर निघलेले दूध हे दोन्ही जरी पांढरे असले तरी दोघांच्याही चवीमध्ये फरक असतो. अनेक जातीचे लोक असतात ते विविध रंगाचे असतात व विविध गुणधर्माचे असतात व हे सर्व मिळून जे तयार होते त्याचेच नाव जग असते जग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “काजव्याचा प्रकाश हा फक्त त्याच्या ढुंगणाभोवतीच असतो त्याप्रमाणे वरवर शब्दज्ञान हे फक्त मर्यादापुरतेच असते आणि अंत:करणापासून आलेला अनुभव हा जगमान्य असतो.”
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.