मधुराष्टकम्

मधुराष्टकम्

येथे क्लिक करून मधुराष्टकम् चा ऑडिओ डाउनलोड करा

मधुराष्टकम् अथवा मधुराष्टक(संस्कृत: मधुराष्टकम्) ही भगवान कृष्ण, कवि श्रीपाद वल्लभाचार्य यांनी रचलेली ही एक सुंदर संस्कृत रचना आहे.कवि श्रीपाद वल्लभाचार्य हे पंधराव्या शतकातील आंध्र प्रदेशातील विजयनगर या राज्याचे राजे श्री कृष्णदेव यांच्या दरबारातील कवि होते. त्‍यांनी व्यास सूत्र भाष्य, जैमिनीय सूत्र भाष्य, भागवत टीका सुबोधिनी, पुष्टि प्रवळा, मर्यादा आणि सिद्धान्त, रहस्य संस्कृत यांसह त्यांनी बरीच साहित्य निर्मिती केली.

मधुराष्टक या भक्तिरसपूर्ण रचनेत कृष्णप्रेमात सगळेच कसे मधुर होते याचे नितांत सुंदर वर्णन आहे. ही रचना जौनपुरी रागात गायली जाते.


अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरम्
हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||१||

मधुराधिपतीचे ओठ मधुर आहेत, वदन (मुख) मधुर आहे, नयन मधुर आहेत, हास्य मधुर आहे, हृदय मधुर आहे, गती मधुर आहे. मधुराधिपतीचे सर्वच मधुर आहे. ॥ १ ॥

वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरम्
चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||२||

त्याचे बोलणे मधुर आहे. त्याचे चरित्र मधुर आहे. वस्त्र मधुर आहे, अंगविक्षेप मधुर आहेत, चालणे मधुर आहे, फिरणे मधुर आहे. मधुराधिपतीचे सर्वच मधुर आहे. ॥ २ ॥

वेणुर्मधुरो रेणुर्मधुरः पाणिर्मधुरः पादौ मधुरौ
नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||३||

त्याची बासरी मधुर आहे, चरणरज मधुर आहेत, हात मधुर आहेत, पाय मधुर आहेत, नृत्य मधुर आहे, सख्य मधुर आहे, मधुराधिपतीचे सर्वच मधुर आहे. ॥ ३ ॥

गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरम्
रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||४||

त्याचे गान मधुर आहे, पिणे मधुर आहे, भोजन (खाणे) मधुर आहे, शयन मधुर आहे, रुप मधुर आहे, तिलक मधुर आहे, मधुराधिपतीचे सर्वच मधुर आहे. ॥ ४ ॥

करणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरम्
वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||५||

त्याचे कार्य (कृति) मधुर आहे, पोहणे मधुर आहे, हरण मधुर आहे, स्मरण मधुर आहे, वमन मधुर आहे, शान्ति मधुर आहे, मधुराधिपतीचे सर्वच मधुर आहे. ॥ ५ ॥

गुञ्जा मधुरा बाला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा
सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||६||

त्याच्या गुंजा मधुर आहेत, माळा मधुर आहेत, यमुना मधुर आहे, तरंग मधुर आहेत, जल मधुर आहे, कमल मधुर आहे. मधुराधिपतीचे सर्वच मधुर आहे. ॥ ६ ॥

गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं मुक्तं मधुरम्
दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||७||

गोपी मधुर आहेत, लीला मधुर आहे, संयोग मधुर आहे, भोग मधुर आहेत, निरीक्षण मधुर आहे, शिष्टाचार मधुर आहे. मधुराधिपतीचे सर्वच मधुर आहे. ॥ ७ ॥

गोपा मधुरा गावो मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा
दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||८||

गोप मधुर आहेत, गायी मधुर आहेत, हातातील छ्डी मधुर आहे, सृष्टी मधुर आहे, द्वैत मधुर आहे, फळ मधुर आहे.

मधुराधिपतीचे सर्वच मधुर आहे. ॥ ८ ॥

.. इति श्रीमद्वल्लभाचार्यविरचितं मधुराष्टकं सम्पूर्णं ..

मधुराष्टकम् समाप्त

हे पण पहा: संत साहित्य चे पुस्तके विकत घ्या 


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

1 thought on “मधुराष्टकम्”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *