pandharichi wari - पंढरीची वारी

pandharichi wari – पंढरीची वारी

pandharichi wari information in marathi

सकाळ मंगल निधी |श्री विठ्ठलाचे नाम आधी|

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणार्या सावळ्या विठ्ठलाच्या आषाढी एकाद्शी दिवशी भरणार्या यात्रेसाठी देशातील विविध भागातून भाविक येतात. लाखोच्या घरात वारकर्यांची गर्दी भीमेच्य काठी जमा होते. मात्र या सोहळ्यासाठी चालत येणारा आळंदी ते पंढरपूर हा पायी वारी सोहळा हा अवर्णनीय आहे.

१८ दिवस चालून आषाढी एकादशी दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लगलेली उत्कंठा, देहभान हरपून वारीमध्ये चालणारे व नाचणारे वारकरी, विविध ठिकाणी होणारी रिंगणे, आणि दैनंदिन आयुष्यापासून काही दिवस दूरहोऊन दिंडीतून मिळणारे अध्यात्मिक समाधान, यातून जीवनाचे सार्थक सांगणारी वारी ही संकल्पना मानवी जीवाच्या उद्धारासाठी प्रेराणादाई आहे. पृथ्वीवरील मोठ्या संखेने एकत्र येऊन मानवी जीवाच्या कल्याणासाठी, आत्मिक उद्धारासाठी, समतेसाठी आणि परमेश्वरप्राप्तीसाठी वारीतून विठ्ठलाकडे साकडे घालणारी वारकरी परंपरा असून पंढरीची ही वारी म्हणजे पृथ्वीवरील एक अभूतपूर्व सोहळाच म्हणावा लागेल.

कोणतेही निमंत्रण नसताना लाखोंच्या संखेने एकत्र येवून हरिनामाच्या गजरात गुण्यागोविंदाने वारकर्यांचा हा लवाजमा चालत असतो. आप- पर भाव विसरून सर्वांच्या भल्यासाठी एकत्र येणारा हा वारकर्यांचा जनसमुदाय म्हणजे विश्वातील एक अनोखा मेळावाच आहे. या दैदिप्यमान सोहळ्यातील सात्विकता, त्याग, भक्ती, निस्पृहता यामुळे वारी हा एक सत्वगुणाचा सोहळा आहे असे म्हणता येईल. संत तुकोबाराय म्हणतात की

पंढरीची वारी आहे माझ्या घरी | आणिक न करी तीर्थव्रत |

याचा आर्थ सा कि, ज्याच्या घरी पंढरीची वरे आहे त्यांना इतर तीर्थक्षेत्री जाण्याची गराज नाही. एक ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की

वाराणसी गया पहिली द्वारका | परी नये तुका पंढरीच्या |

वर्षभर २४ एकादशी असतात. त्यामधील आषाढी, कर्तीकी, चैत्री आणि माघी अश्या चार एकादशीला पंढरपुरात यात्रा भरते. यामधील आषाढी वारीला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व आहे.

आषाढी कार्तिकी विसरू नका मज | सांगतसे गुज पांडुरंग |

या न्यायाने आषाढी एकादशीला पंढरपुरात वैष्णवांची मांदियाळी जमा होण्याची ७५० वर्षांची परंपरा आहे. वारकारी संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला त्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माउलीनी घालून दिलेल्या विचारांवर आणि शिकवणुकीवर आजपर्यंत शेकडो वर्षे ही वारकरी परंपरा महाराष्ट्रात चालत आली आहे. पंढरीची वारी ही अनादी काळापासून चालू आहे. परंतु ही वारी वैयक्तिक स्वरूपात असायची. या वारीला सांघिक रूप देण्याचे महत्वाचे कार्य हैबतबाबा यांनी केले. तिथून पुढे आजतागायत ही पंढरीची वारी उत्तरोत्तर वाढत आहे.


पंढरीची वारी(pandharichi wari) पृथ्वीवरील एक अभूतपूर्व सोहळा

pandharichi wari picture

पंढरीच्या वारी सोहळ्यात ज्ञानेश्वर महाराज यांचा आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा असे दोन पालाखी सोहळे असतात. ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्यात सुमारे ५ ते ६ लाख वारकरी आणि हजारो दिंड्या सह्भगी होतात. तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात २ ते अडीच लाख वारकरी असतात. ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्यात माउलींच्या रथामागे २७ दिंड्या तर रथामागे ३०० दिंड्या या नोंदानिधाराक आहेत. जगद्गुरू तुकाराम महाराज महाराज पालखी सोहळ्यात नोंदणीकृत ३५० दिंड्या आहेत. तर एकूण हजारोंच्या संखेने नोंदणी नसलेल्या छोट्या मोठ्या दिंड्या या पायी वारी सोहळ्यात माऊलींसोबत आणि तुकोबारायांसोबत चालत असतात.

एका दिंडीमधील वारकर्यांची संख्या ५० ते १ हजारांपर्यंत असते. शिवाय या वारी सोहळ्यात सकल संतांच्या पालख्याही सहभागी असतात. त्या दिंड्यांचे प्रमुख आपपापल्या दिंडीचे संचालन आणि नियोजन करतात. १८ दिवस चालणार्या या आषाढी वारी पालखी सोहळ्यात वारकरी आपले घर दार सोडून सहभागी होतात. शेतकरी, व्यापारी, नोकरदार, या सर्व वर्गातील भाविक या वारीत सहभागी होतात. या वारी सोहळ्यामधील धवलवस्त्राधरी वारकरी म्हणजे जणू शुद्धतेचे आणि सात्विकतेचे प्रतिक आहेत. पांढरा सदरा,धोतर,डोक्यावर टोपी, कपाळावर बुक्का, गळ्यांत तुळशीची माळ असा वारकर्यांचा पेहराव आहे. तर डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेतलेल्या महिला वारकरीही या सोहळ्यात मोठ्या संखेने असतात.

या रे यारे लहान थोर | याती भलते नारी नर | किंवा सकळासि येथ आहे अधिकार | कालीयुगी उद्धार हरीच्या नामे |

या संत वचनानुसार वारी ही स्त्री- पुरुष, उच्च=नीच- गरीब -श्रीमंत यांसारख्या भेदांच्या पलीकडील असून समतेची शिकवण आणि अंगीकार करणारी ही वारी आहे.समस्त भाविक लौकिक जीवनातील ओळख विसरून फक्त वारकरी म्हणून वारीमध्ये सहभागी होतात. विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालणे, देहभान हरपून नाचणे,फुगड्या खेळणे, तसेच एकत्र भोजन, सायंकाळी भजन आणि कीर्तन यामधून मिळणारा निर्भेळ असा आनंद वारीमधून मिळत असतो.

लाउनी मृदंग श्रुती टाळ घोष| सेऊ ब्रह्मरस आवडीने,

या न्यायाने वारकरी ब्रह्मरसाचा आस्वाद घेतात. दिंडीप्रमुख, विणेकरी, चोपदार, झेंडेकरी, टाळकरी, गायक, कीर्तनकार,मृदंगवादक अशी दिंडीची रचना असते. यामध्ये प्रत्येकाने आपापले काम चोखपणे पार सांभाळायचे असते. तसेच स्वयंपाकी, तंबू ठोकणारे, वाहतूक,पाणीपुरवठा, साहित्य खरेदी यासाठी लागणारी यंत्रणा स्वतंत्रपणे दिन्डीप्रमुखानी निर्माण केलेली असते. वारकरी दररोज २० ते २५ किलोमिटर चालतात. सकाळी काकडा अरती, भूपाळ्या, दुपारी चालता चालता भजन, सायंकाळी हरिपाठ, नंतर कीर्तन आणि रात्री हरिजागर असा अखंड नामस्मरणाचा जयघोष चालू असतो.

प्रत्येकाच्या मुखातून माऊली.. माऊली चां जयघोष आणि ज्ञानोबां-तुकारामच्या जातालावार नाचणारे टाळकरी यामुळे वातावरण भक्तिमय बनते.दिंडीच्या आग्रस्थानी झेंडेकरी, त्यानंतर विणेकरी, तुलासिवृन्दावन घेतलेली महिला वारकरी, त्यापाठोपाठ मृदंगवादक आणि गायक, टाळकरी अशी दिंडीची रचना असते. वारीमध्ये वारकरी एकमेकांच्या पाया पडतात. यामधून मानवी मनातील अहंकार नावाचा दोष नष्ट होतो. तसेच वारीतून समतेचा संदेश दिला जातो. परमात्म्याची प्राप्ती हे मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट जे प्रपात करण्यासाठी लागणारी, त्याग भावना, वैराग्यवृत्ती, समभाव,भक्तीभाव, यांची मुक्त उधळण वारीमध्ये पहायला भेटते. देह जाओ अथ वा राहो| पांडुरंगी दृढ भावो या संतवचनानुसार वारकरी तहानभूक हरपून भक्तिरसात न्हाऊन जातात.

ऊन, वारा, पाउस, यांची फिकीर न करता सर्व वारकरी निष्ठेने वारीत चालतात. वयाची साठी पार केलेले लाखो वारकरी देखील तरुणांप्रमाणे जोशाने नाचतात आणि(pandharichi wari)

भाग गेला शीण गेला |अवघा झाला आनंद |

ही स्थिती वारीमध्ये प्राप्त होते. वारीमधील वारकर्यांकडून शिस्त अतिशय काटेकोरपणे पाळली जाते. वेळेचे बंधन पाळले जाते. दैनंदिन कार्यक्रम वेळच्यावेळी आटोपला जातो. दिंडी सोडून बाहेर इतरत्र भटकता येत नाही.आपआपल्या नेमून दिलेल्या कामना सार्वजन वाहून घेतात. दिवसभर चालून दमून भागून गेलील वारकरी संध्याकाळी भजन करतात आंनी या हरीनामातून त्यांचा शिणवटा दूर होतो.(pandharichi wari)


pandharichi wari information in marathi – पंढरीची वारी माहिती

तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

1 thought on “pandharichi wari – पंढरीची वारी”

  1. अंजली अजित अभ्यंकर

    मला दिंडी मध्ये सहभागी व्हावयाचे आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *