बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

ज्ञानाचा सागर – संत जनाबाई अभंग – १९२

ज्ञानाचा सागर – संत जनाबाई अभंग – १९२


ज्ञानाचा सागर ।
सखा माझा ज्ञानेश्वर ॥१॥
मरोनियां जावें ।
बा माझ्याच्या पोटा यावें ॥२॥
ऐसें करी माझ्या भावा ।
सख्या माझ्या ज्ञानदेवा ॥३॥
जावें वोवाळुनी ।
जन्मोजन्मीं दासी जनी ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ज्ञानाचा सागर – संत जनाबाई अभंग – १९२

1 thought on “ज्ञानाचा सागर – संत जनाबाई अभंग – १९२”

  1. प्रमोद राजाराम घोलप

    ज्ञानाचा सागर!
    सखा माझा ज्ञानेश्वर !
    मरोनीया जावे !
    बाबा तुमच्या पोटा यावे !!
    ऐसे करी माझ्या भावा !
    सख्या माझ्या ज्ञानदेवा !! जावे ओवाळूनी जन्मोजन्मी!
    दासी जनी !!

    प्रस्तुत कीर्तन रुपी सेवेकरिता घेतलेला संत जनाबाईचा संत ज्ञानेश्वराचे महत्त्व सांगणारा अभंग या ठिकाणी घेतलेला आहे.

    या अभंगात जनाबाई म्हणते,

    ज्ञानाचा सागर सखा माझा!
    ज्ञानेश्वर ज्याच्याकडे ज्ञानाचा पुर्ण भंडारा भरलेले आहे .असा तो चैतन्याचा जिव्हाळा संत ज्ञानेश्वर माझा सखा आहे

    किती सुंदर वर्णन जनीने माऊली बद्दल केले आहे ? अशा त्या महान संताच्या पोटी माझा जन्म व्हावे .

    म्हणून जनाबाई दुसर्‍या चरणात सांगते ,

    मरोनीया जावे!
    बाबा तुमच्या पोटा यावे!!

    जनी म्हणते जन्मोजन्मी तुझी सेवा मला करायचे आहे. म्हणून मी माऊलीला म्हणते मरोनीया जावे बाबा पण पुन्हा माझे जन्म संत ज्ञानदेवाच्या पोटी जन्माला यावे म्हणून मी व्याकुळली आहे.

    म्हणून जनाबाई अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगते,

    ऐसे करी माझ्या भावा !
    सख्या माझ्या ज्ञानदेवा!

    मी एक सामान्य जीव आहे .मला तुमच्या सारख्या साधुसंताचे दर्शन व्हावे ऐवढाच उद्देश आहे. कारण तुम्ही महाविष्णूचा अवतार धारण करून या वारकरी संप्रदायाचा पाया रचला ,ते संत ज्ञानेश्वर माऊली माझे भाऊ आहेत …..तुच माझा सखा आहेस…….. कैवारी करुणाकरा ……..तु दिनाचा नाथ आहे….. दयाघन आहे…….
    फक्त तुझ्या नामस्मरणात काही अंतर पडू नये म्हणून मी म्हणाले.

    म्हणून जनाबाई अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणते,

    जावे ओवाळूनी !
    जन्मोजन्मी दासी जनी !!

    अशा त्या महान विभुतीला मी ओवाळूनी जाते असे जनाबाई म्हणते .ऐवढेच नाही तर जन्मोजन्मी दासी जनी संत ज्ञानेश्वर माऊलीची सेवा करीन असे म्हणते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *