माझिया जातीचा मज भेटो – संत संताजीचे अभंग – १
माझिया जातीचा मज भेटो कोणी ।
आवडिची धनी पुरवावया ।। १ ।।
माझिया जातीचा मजशी मिळेल ।
कळेल तो सर्व समाचार ।। २ ।।
संतु म्हणे येथे पाहिजे जातीचे ।
येर गबाळाचे काम नाही ।। ३ ।।
वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.
माझिया जातीचा मज भेटो – संत संताजीचे अभंग – १
संत जगनाडे महाराजानी माझ्या जातीचे म्हणजे परमार्थाच्या वाटेवर चालणारे भेटू दे म्हणजे सर्व समाचार बातम्या कळतील असे म्हटल आहे आणि माझ्या जातीचे लोक होणे हे काही साधेसुधे येरा गबाळाचे काम नसून ते माझ्या जातीच्या लोकांचे च काम आहे असे प्रतिपादन करतात …. जय संत श्री संताजी जगनाडे महाराज की जय ….?????????