गायें नाचें वाहे टाळी – संत तुकाराम अभंग – 1018
गायें नाचें वाहे टाळी । साधन कळी उत्तम हें ॥१॥
काय जाणों तरले किती । नाव आइती या बैसा ॥ध्रु.॥
सायासाचें नाहीं काम । घेतां नाम विठोबाचें ॥२॥
तुका म्हणे निर्वाणीचें । शस्त्र साचें हें एक ॥३॥
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
गायें नाचें वाहे टाळी – संत तुकाराम अभंग – 1018
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.