संत तुकाराम अभंग

वैकुंठा जावया तपाचे सायास – संत तुकाराम अभंग – 214

वैकुंठा जावया तपाचे सायास – संत तुकाराम अभंग – 214


वैकुंठा जावया तपाचे सायास ।
करणें जीवा नाश करणे बहु ॥१॥
तया पुंडलिकें केला उपकार ।
फेडावया भार पृथ्वीचा ॥२॥
तुका म्हणे सोपी केली पायवाट ।
पंढरी वैकुंठ भूमीवरी ॥३॥

अर्थ
पूर्वी लोकास वैकुंठाला जाण्यासाठी तपश्चर्‍यासारखे कष्ट करावे लगत असत; त्यामध्ये जीवही गमवावा लगत असे .पण भक्त पुंडलिकाने भक्तांवर मोठा उपकार केला आहे; त्याने दाखविलेल्या भक्तीमार्गामुळे पृथ्वीवरच्या दुर्जनांचा भार कमी झाला .तुकाराम महाराज म्हणतात, की वैकुंठाची अवघड पायवाट सोपी झाली आहे, ही पायवाट म्हणजे पंढरीच्या रूपाने पृथ्वीतलावर वैकुंठ आले आहे .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play


वैकुंठा जावया तपाचे सायास – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *