संत तुकाराम अभंग

देखोनि हरखली अंड – संत तुकाराम अभंग – 52

देखोनि हरखली अंड – संत तुकाराम अभंग – 52


देखोनि हरखली अंड ।
पुत्र जाला म्हणे रांड ।
तंव तो जाला भांड ।
चाहाड चोरटा शिंदळ ॥१॥
जाय तिकडे पीडी लोकां ।
जोडी भांडवल थुंका ।
थोर झाला चुका ।
वर कां नाहीं घातली ॥ध्रु.॥
भूमि कांपे त्याच्या भारें ।
कुंभपाकाचीं शरीरें ।
निष्ठुर उत्तरें ।
पापदृष्टी मळिणचित्त ॥२॥
दुराचारी तो चांडाळ ।
पाप सांगातें विटाळ ।
तुका म्हणे खळ ।
म्हणोनियां निषिद्ध तो ॥३॥

अर्थ
आपुल्याला पुत्र झाला म्हणून एक स्त्री मनातून आनंदी झाली ; पण पुढे तो पुत्र भांडखोर, चोर, दुर्वर्तनी निघाला .तो जिकडे जाईल तिकडे लोकांना पीडा देत असे, त्यामुळे लोक त्याला त्रासले होते, त्याच्या आईने मोठी चूक केलि की तिने जन्मतच त्याला मरून टाकले नाही .ज्याच्या देहभाराने भूमि थरथर कापते , जो दुसर्यांना अपशब्द बोलतो, ज्याचे चित्त मलिन व पापी आहे, तो साक्षात कुंभीपाक नरकाचे रूप आहे .तुकाराम महाराज म्हणतात, तो दुराचारी, चांडाळ असून पापालासुधा त्याच्या संगतीत विटाळ होतो, अशा खळप्रवृत्तीचा धिक्कार असो .


हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .


देखोनि हरखली अंड – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *