संत तुकाराम अभंग

देखोनि पुराणिकांची दाढी – संत तुकाराम अभंग – 91

देखोनि पुराणिकांची दाढी – संत तुकाराम अभंग – 91


देखोनि पुराणिकांची दाढी ।
रडे स्फुंदे नाक ओढी ॥१॥
प्रेम खरें दिसे जना ।
भिन्न अंतरीं भावना ॥ध्रु.॥
आवरीतां नावरे ।
खुर आठवी नेवरे ॥२॥
बोलों नयें मुखावाटां ।
म्हणे होतां ब्यांचा तोटा ॥३॥
दोन्ही सिंगें चारी पाय ।
खुणा दावी म्हणे होय ॥४॥
मना आणितां बोकड ।
मेला त्याची चरफड ॥५॥
होता भाव पोटीं ।
मुखा आलासे शेवटीं ॥६॥
तुका म्हणे कुडें ।
कळों येतें तें रोकडें ॥७॥

अर्थ
एका मंदिरात पुराणिकाचे पुराण ऐकतांना एक धनगर स्फुंदुन स्फुंदुन रडत असे .लोकांना वाटे, तो पुराणीकांवरील श्रद्धेमुळे राडतो आहे, पण त्याला पुराणीकांची दाढ़ी पाहुन आपल्या बोकडयाची आठवण येत असे .त्याला बोकडयाचे खुर, पाय आठवत असत .इतर सर्व शेळ्यान मधे हा एकच बोकड होता .पुराणीकांने माया आणि ब्रम्ह अशी दोन बोटे वर केली की त्याला वाटे, बोकडाचि दोन शिंगे, चार वेदांसाठी त्यांनी चार बोटे वर केली की त्याला वाटे, बोकडयाचे चार पाय; या साठी या खुना आहेत .धनगराला मेलेल्या बोकडयाची आठवण येत असे .पुराणीकांना पाहुन धनगराला मेलेला बोकड आठवला, हा त्याच्या मनातील भाव शेवटी बाहर पडला .तुकाराम महाराज म्हणतात, प्रपंचिक मनुष्याच्या अंत:करणात काही लपुन राहत नाही, सत्य बाहर पडते .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


देखोनि पुराणिकांची दाढी – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

1 thought on “देखोनि पुराणिकांची दाढी – संत तुकाराम अभंग – 91”

  1. Adv prashant meshram

    alongwith tukaram , please send buddha sahitya i will be grateful to you thanks.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *