ह.भ.प. वेदांताचार्य नारायण महाराज कोरडे गुरुजी

ह.भ.प. वेदांताचार्य नारायण महाराज कोरडे गुरुजी

ह.भ.प. वेदांताचार्य नारायण महाराज कोरडे गुरुजी


मो : 9637958178

सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार | गायनाचार्य

पत्ता : रा.मलनाथपुर.ता.परळी वै जि.बिड

पणजोबा नारायण जयवंतराव कोरडे यांच्या अगोदर पासून आमचा वारकरी घराणा आहे.
बारावर्ष गुरुवर्य भाऊंच्या सेवेमध्ये राहुन त्यांच्या डे अध्ययनाचा योग आला. तिथे असतानाच गुरुवर्य गणेश महाराज पाटील, गुरुवर्य मारुती महाराज तुनतुने शास्त्रीजी, गुरुवर्य ज्येष्ठ गुरुबंधू विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन मला लाभले.
पंढरपूरला मला ज्ञानेश्वरी विचारसागर वृत्तीप्रभाकर विचारचंद्रोदय पंचदशी तर्कसंग्रह गीताभाष्य उपनिषदभाष्य ब्रह्मसूत्रभाष्य संस्कृत भांडारकर (दोन्ही भाग) लघुकौमुदी रचनानुवाद श्रीमद्भागवत आदी ग्रंथाचे अध्ययन करण्यास मिळाले.
सध्या आम्ही कीर्तन प्रवचन श्रीमद्भागवत कथा तसेच ऑनलाईन संस्कृत क्लास हे उपक्रम चालवतो. हरिपाठापासून ब्रह्मसूत्र उपनिषदा पर्यंत सर्व ग्रंथाचे पाठ क्रमाक्रमाने चालवतो. यामधील काही ग्रंथांचे पाठ ऑनलाइन चालतात. ज्यांना ऑनलाइन ग्रंथांचे पाठ श्रवण करायचे आहेत. त्यांनी माझ्या नंबर वर संपर्क साधावा.
माझा अनुभव एवढाच आहे आपण ज्या भावनेने भगवंताला शरण जातो त्या प्रकारे भगवान आपल्याला फळ देतो . भगवंताचे प्रेम आणि नामस्मरण हेच कलियुगामध्ये उद्धाराचे साधन आहेत.
पाच वर्षाच्या मुला पासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वांना संस्कृत कळावे म्हणून सुलभ संस्कृत व्याकरण पुस्तकाची रचना केली ते आज बाजारात उपलब्ध ही आहे या संस्कृत पुस्तका ची विशेषता अशी आहे की संस्कृतचे मुख्य नियम न बदलता लहानातील लहान मुलांना संस्कृत सहज कळते ज्यांना हे पुस्तक पाहिजे आहे त्यांनी पुढील नंबर वर संपर्क साधावा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *