स्वामी माधवानंद सरस्वती खर्ची आश्रम एरंडोल (जळगाव ) यांनी सप्तशृंगी देवीचे माहेर खानदेश कसे ? अर्थात ४० देवींच्या उत्पत्तीची मुळ कथा, हा व्हिडीओ you tube वर टाकून जवळपास तीन वर्षे होत आहेत. या काळात २ कोटी ८० लाखांहून अधिक भाविकांनी हा व्हीडीओ बघितला आहे. स्वामी माधवानंद सरस्वती यांनी पुराण कालापासूनच्या यच्चयावत माहितीचा धांडोळा घेऊन, तिचा बारकाव्यासह अभ्यास केला. त्यांनी सप्तशृंगी देवीचे भ्रमण व अवतारकार्य सुसंगतपणे मांडले आहे. नाथसंप्रदायाची अधिष्ठात्री म्हणून सप्तशृंगी देवीच्या एका वेगळ्या आणि महत्वाच्या पैलूवर प्रकाशझोत टाकला आहे.
स्वामी माधवानंद सरस्वती यांनी पुराण कालापासूनच्या यच्चयावत माहितीचा धांडोळा घेऊन, तिचा बारकाव्यासह अभ्यास केला. त्यांनी सप्तशृंगी देवीचे भ्रमण व अवतारकार्य सुसंगतपणे मांडले आहे. नाथसंप्रदायाची अधिष्ठात्री म्हणून सप्तशृंगी देवीच्या एका वेगळ्या आणि महत्वाच्या पैलूवर प्रकाशझोत टाकला आहे.
जोगेश्वरी आखाडा ता. राहुरी जि. अहमदनगर येथील अष्टभैरव, खान्देशामध्ये सप्तशृंगीच्या माहेरी अर्थात सिध्दचंद्रवट तिर्थी पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या करण्याकरता आले. शिवप्रसन्न होऊन म्हणाले, ‘काय मागायचे ते मागा’, त्यावर त्यांनी सांगितले, ‘आम्हाला संतती नाही’, भगवान शिव म्हणाले, ‘या जन्मात तुम्हाला संतती नाही. पण या क्षेत्राचे तपपुण्य म्हणून मी तुम्हाला प्रसाद देतो. जा, समोरच्या डोहात स्नान करून या.’ स्नान करत असतांना त्यांच्या हाताला बालीकेचा स्पर्श झाला. त्यांनी बालीकेला उचलून भगवान शंकरापुढे ठेवले आणि म्हणाले, ‘आम्हाला कन्या सापडली.’ त्यावर भगवान शंकर म्हणाले,’ मी बोलून गेलो, प्रसाद देतो म्हणून….. तर हा प्रसाद घ्या… हिला लहानाची मोठी करा… हिच्या योगे त्रैलोक्याचा भुभार कमी होईल… महिषासुराच्या वधाला हि कारणी भूत ठरेल.’ त्याप्रमाणे त्यांनी तिला लहानाचे मोठे केले… ती वयात आली… त्यांनी तिच्या लग्नाचा विचार केला. पण कन्येने नकार दिला. तिने मातापित्यांना सांगितले,’ मी तुम्हाला न विचारता निघून जाईन’, त्यावर मातापित्यांनी विचारले, ‘कुठे जाणार ?’ त्यावर ती म्हणाली, ‘जाईन कुठेही तपश्चर्या करण्यासाठी.’ त्यावर माता पिता म्हणाले,’ मग असे कर, कुठे तरी जाण्यापेक्षा, जा तुझ्या जन्मस्थानी.’ कन्येने जन्मस्थळाकडे प्रयाण केले. मार्गात कुठे स्नान केले, कुठे पूजा केली, कुठे भोजन केले, कुठे विश्रांती घेतली. सिध्दचंद्रवट स्थळापर्यंत अशा २० शक्ती स्थळांची निर्मिती झाली. तिने तिथे घोर तप केले. त्या तपश्चर्येने भगवान शिव प्रसन्न झाले आणि म्हणाले,’ काय मागायचे ते माग’. त्यावर ती म्हणाली, ‘माझ्या निमित्ताने असुरांचे समुळ मर्दन व्हावे. या पुण्यस्थळी आदिशक्तिचा आवेश अवतार व्हावा. माझ्या नुसत्या स्मरणाने तिन्ही लोकांतील देवांना युध्दप्रसंगी शस्त्र अस्र विद्या मिळावी. त्यायोगे त्यांची दसपट शक्ती वाढावी. त्यामुळे देव कधीच पराजित होणार नाहीत.’ यावर शिव अती प्रसन्न झाले आणि म्हणाले,’ आज मी तुझे नामकरण करतो, ….नाम तुझे वज्रेश्वरी.’ समोरुन महिषा आला. तो धडक मारणार तेवढ्यात भगवान शिवांनी पार्वतीला सांगितले,’ काय बघतेस, उडव त्याचे शिर. ‘ म्हणून या ठिकाणी माता पार्वतीने सिंहारुढ अष्टभूजा अवतार घेतला. म्हणूनच सिध्दचंद्रवट तिर्थ सप्तशृंगीचे माहेर ठरले.
कन्याने कोल्हार भगवतीपूर, पिंपरी – निर्मळ, राहाता, कोपरगाव, धुळे पारोळा मार्गे तिचे जन्मस्थळ सिध्दचंद्रवट तिर्थ अर्थात तिच्या माहेरी प्रस्थान केले. या मार्गावर २० शक्तीपीठांची निर्मिती झाली आहे. आदिशक्ति पार्वती मातेचे सप्तशृंगीच्या रुपातील अवतारकार्य ज्या भुमीत घडले तोच हा परिसर…. सध्याच्या अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, धुळे व नाशिक जिल्ह्यांच्या परीसरात घडलेली घटना, खरोखरच आपल्यासाठी श्रध्येय आहे. स्वामी माधवानंद सरस्वती खर्ची आश्रम एरंडोल ( जळगाव ) यांच्या असीम प्रयत्नातून आणि दिर्घकालीन तपश्येतून ही अनमोल माहिती जनसामान्यांसमोर आली आहे. नाथसंप्रदायाच्या गोरखपूर ( उत्तरप्रदेश) पीठाचे प्रमुख महंत योगी (मुख्यमंत्री, उत्तरप्रदेश ) यांनीही ही महत्त्वपूर्ण माहिती आस्थेने जाणून घेतली आहे.
ज्या परिसरात आदिशक्ति पार्वतीमातेचे सप्तशृंगी देवीच्या रुपात अवतारकार्य झाले आहे, तेथील सर्वसामान्यांच्या घराघरात ही माहिती जावी अशी, शिवपूराण कथाकार, रामायणाचार्य, श्रीमद भागवताचार्य, दत्तपूराण, नर्मदापूराण, श्री श्री १००८ आचार्य महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वती, श्री सप्तशृंगीचे माहेर (खर्ची आश्रम ट्रस्ट ) एरंडोल, जळगाव, यांची तीव्र इच्छा आहे…….जोगेश्वरी आखाडा ते सिद्धचंद्रवट तिर्थ ते सप्तशृंगी गडापर्यंत ज्या मार्गाने देवी गेली आणि या मार्गाने जाताना ज्या ४० ठिकाणी देवीने विश्रांती घेतली किंवा शयन केले किंवा भोजन केले, त्या शक्तिस्थानांचे महात्म्य जनतेसमोर आणावे, अशी स्वामी माधवानंद सरस्वती, यांची इच्छा आहे…… तसेच या ४० स्थानांची एक परिक्रमा (नर्मदा परिक्रमेप्रमाणे ) सुरू करावी असाही त्यांचा मानस आहे. या ४० ठिकाणी देवीचा जागर भव्यदिव्य स्वरुपात, सार्वजनिकरित्या व्हावा, अशी त्यांची मनिषा आहे……सप्तशृंगी देवीचे माहेर सिध्चंद्रवट तिर्थ ते सप्तशृंगी गड दिंडी सोहळा साजरा करण्याचा संकल्प सुध्दा त्यांनी केला आहे….. सप्तशृंगी देवीचे या परिसरात घडलेले अवतारकार्य सर्वदुर घराघरात जावे यासाठी चित्रपट निर्मिती करणेसाठी स्वामी प्रयत्नशील आहेत. टिव्ही सिरीयल च्या माध्यमातून हा विषय मांडता येईल का, याचीही ते चाचपणी करीत आहेत. त्यासाठी आवश्यक असलेले ग्रंथ स्वामींनी तयार केले आहेत. त्या ग्रंथात सप्तशृंगी देवीच्या अवतारकार्याची संपूर्ण माहिती अत्यंत साध्या व सोप्या भाषेत दिलेली आहे.
स्वामींच्या ऐतिहासिक कार्यात सर्व भाविकांनी सहभाग घ्यावा अशी अपेक्षा यानिमित्ताने सर्वच थरातून व्यक्त होत आहे. आदिशक्ति माता सप्तशृंगीच्या कृपाशिर्वादाने या सर्व इच्छा आकांशा नजीकच्या भविष्यात प्रत्यक्षात येतील अशी खात्री आहे… जय सप्तशृंगी माता
सौ. सुनंदा व श्री. उत्तमराव निर्मळ सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग व परिवार, संपर्क.. 7219202141
सप्तशृंगी चे माहेर खान्देश कसे ?
अर्थात तिच्या अवताराची अनंतलीला यशोगाथा अंतरंग खोली वेदपुराणाधार जसीच्या तसी प्रगट, सप्तश्रुंगी चे माहेर खान्देश कसे? या ग्रंथाची शुध्दरचना असामान्य, अजिंक्य,तर्कशुद्ध,तत्वज्ञान पुर्वक सर्व समावेशक जणु ग्रंथ हा संस्कृतीचा दैवी सुवर्ण अलंकार शास्त्रशुध्द वैधानिक दिव्यता तथा दिव्यखाणी निजभक्तांना संकटकाली सुखरूप तरुण जाण्यासाठी नौका कवच आहे,जशी एकादी दैदीप्यमान तेजस्वी दुर्मिड वस्तु हजारो वर्ष मातीत पडुन राहावी अन तिला जन्मांध्याने किंवा अनाभिज्ञांनी तिला मातीबरोबर तुडवावी.अगदी असेच घडले.
तात्पर्य- जगाच्या दृष्टीआड असलेल्या प्राचीन खुणा जसे गंगा अवतरण भगीरथ निमित्त ठरले तसेच दिव्य गौप्य ठेवा.शिवशक्ती योजनेतुन स्वामीजी निमित्त ठरले.
आपल्या हिंदू वेद पुराण धर्मग्रंथात भारतामध्ये पंचवटाची महती सांगितली आहे.
(१)जेथे श्रीमद्भागवताचा जन्म नैमिषारण्य सिद्धवट
(२) वृंदावनातील वंशीवट
(३) उज्जैनी क्षेत्रातील मोक्ष वट
(४) प्रयागराज त्रिवेणी संगमावरील अक्षयवट
(५) महाराष्ट्राचे (खानदेशाचे)महत्व भाग्य पाचवा वट ज्याचे नाव वेद पुरानी सिद्ध चंद्रवट या नावाने या वडाचे स्थान महात्म्य
(१)औरव महामुनी यांनी वडाखाली घोर तप साधना त्याच वडामध्ये शिवपार्वतीचा एक कल्प वास त्याच पुण्य स्थळी वज्रेश्वरी चा जन्म तिचे तप महिषासुराचे वैर तेथेच तपोभंग केला म्हणून माता पार्वतीने त्याचं पुण्य स्थळी सिंह रूढ अष्टभुजा अवतार घेतला म्हणून तेथे मल युद्ध झाले. त्या महिषाचे दक्षिणेकडे पलायन झाले महिषाचा वध ते म्हसावद, धड उडाले ते म्हसवे ,शिर फेकले ते शिरागड ,ब्रम्हदेवाचा वरदान मनी देहातून जिथे पडला तिथे स्वयंभू मनुदेवी ,यानंतर गडाकडे पलायन पायातील पद्मा पडले ते पद्मालय ,पाट पाटल्या फेकले ते पाटना देवी स्थान, नस्तंन मावळला ते नस्तंनपुर ,दहा अश्रू ढाळले ते दाक्षायणी लासुर, वैजंती माळ तुटून पडली ते वैजापूर, दंडकारण्या मध्ये ठिक ठिकाणी असुरांचा वध करत सातवे शृंगी आरुड स्थापना म्हणून सप्तशृंगीचे माहेर सिद्ध चंद्रवट तीर्थ आहे.याच पुण्य स्थळी अष्ट भैरवांचे तप त्याच पुण्य स्थळी शिव अवतारी गोरक्षनाथांचे तप व वरदान.
सप्तश्रृंगीचे माहेर खान्देश कसे……? माहत्म्य- पुढिल प्रमाणे.
आपल्या सप्तश्रृंगीचे माहेर त्याचे नाव आहे सिध्द चंद्रवट …
१) सप्तश्रृंगीच्या या माहेराला सिध्द चंद्रवट हे नाव का पडले ? …
तर या भूमीवर ‘आर्व’ नावाचे महामुनी याच वट वृक्षाखाली तप करीत होते. हजारो वर्षे तप केले मग तो वड त्या तपाच्या योगाने सिध्द झाला . शिव-पार्वती आले प्रसन्न झाले, काय मागायचे मागा…त्याने युक्तिने असे मागून घेतल की भगवान आपण या ठिकाणी आकल्प वास करावा, भगवान शिव-पार्वतींनी त्यांना आशीर्वाद दिला की ठिक आहे आम्ही या वटवृक्षामध्ये आकल्प वास करू म्हणून हा वड सिध्द वट या नावाने वेद पुराणांमध्ये जाहीर आहे.
२) याच ठिकाणी चंद्राने तप केले, चंद्र दोषमुक्त झाला आणि भगवान शिवांनी चंद्राला दोन वरदान दिले. तु दोषमुक्त होणार आणि त्या निमित्ताने एक ज्योतिर्लिंग तयार होईल ते सैराष्टे सोमनाथचं हे ज्योतिर्लिंग निर्माण झाले. त्याने तिसरा वर मागितला, की या तूमच्या शिव-पार्वती आकल्प वास या शुध्दभुमीत तप केला तर आपण मला वरदान द्या, या जागेमध्ये या वडाला माझं नाव द्यावे.अगोदर चा सिध्दवट त्या वडाला वरदान दिले म्हणून सिध्द चंद्रवट हे नाव ह्या भुमीला शंकरांनी वरदानीत केले.
३) या ठिकाणी अष्टभैरवांनी येवून तप केले.पुत्रप्राप्तीसाठी तप करीत असताना शिव प्रसन्न झाले, भगवान म्हणाले, ह्या जन्मात तुम्हाला संतती नाही पण या तप पुण्याने मीतुम्हाला प्रसाद देतो मग त्यांनी प्रसाद दिला तो असा समोरच्या डोहामध्ये स्नान करायला सांगितले आणि डोहातुन कन्या निर्माण केली . अष्टभैरवांनी पाहिले त्यांच्या पत्नीने जोगेश्वरीने पाहिले त्या कन्याला उचलल भगवान शंकरापुढे ठेवले . भगवान शंकरांनी सांगितले, मी म्हणालो होतो ना ह्या जन्मात तुम्हाला संतती नाही , पण मी प्रसाद देतो हा घ्या, सांभाळा , लहानची मोठी करा तिची त्रिभूवनात किर्ती होईल आणि ही त्रिभुवनाचा भार कमी करण्यासाठी हिची योजना होईल . तिच नाव त्यांनी वैजांगी ठेवले . नंतर ती वयात आली तिने घराचा त्याग केला तप करण्यासाठी माग्रस्त झाली.त्यावेळेस अष्टभैरवांनी तिला सांगितले कुठे तरी जाण्यापेक्षा तु ज्याठिकाणी तुझा जन्म झाला त्याठिकाणी जा मग तिथून सिध्द चंद्रवट ठिकाणी ती कन्या आली तिने घोर तप केला. भगवान शिव प्रसन्न झाले.भगवान शिवानी तिला वर माग म्हटले , तिने तिन वर मागितले. याठिकाणी शक्ति अवतार व्हावा, देवांनी माझ्याकडे मंत्रविद्या मागावी, मागितल्या नंतर मी लगेच देईल आणि त्यांची दहा पट शक्ति वाढेल असे वरदान द्या शंकरांनी वरदान दिले व तिला वज्रेश्वरी हे नाव दिले .अष्टभैरवांनी त्या कन्याला व्रजांगी नाव ठेवले होते पण ह्याच सिध्द चंद्रवट तिर्थी तिचे नाव वज्रेश्वरी ठेवले म्हणून सिध्द चंद्रवट तिर्थी हा चौथा महिमा वज्रेश्वरी चा जन्म सिध्द चंद्रवट तिर्थी झाला .
४) ती कन्या त्या ठिकाणी तप करीत असताना तिन जन्माच म्हैसाच वैर म्हणून तो तपभंग करू लागला तो तपभंग करीत असतांना भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितले की उडव त्याच शिर म्हणून याच पुण्यस्थळी माता पार्वतीने सिंहावृढ अष्टभुजा अवतार घेतला म्हणजे आवेश अवतार घेतला म्हणून ही जागा सिध्द चंद्रवट तिर्थ सप्तश्रृंगीच माहेर ठरलं. नंतर आठव माहात्म्य ह्या जागेच विशेष आहे. आपल्या महाराष्ट्रात ज्ञानेश्वर महाराज म्हणून नाथ संप्रदायाचे थोर संत होऊन गेले . निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे नाथ संप्रदायाचे महान अवतरीत योगी पुरुष होऊन गेले . आख्यायिका आहे लोक सांगतात कथा किर्तनात ऐकायला मिळते कि त्यांची कुलस्वामिनी सप्तश्रृंगी आहे तर सप्तश्रृंगी कशी तर मुळ इतिहास असा आहे .योगी गोरक्षनाथ गो रक्षेतुन बाहेर काढले मच्छिंद्रनाथांनी त्यांना हिमालयाकडे निले व तिथे घोर तप करून घेतल भगवान शंकरांनच त्यांना दर्शन करून दिलं आणि त्यानंतर आशीर्वाद दिला की जा येथून पुढे सिध्द मार्गातून नाथ संप्रदायाचे प्रचार प्रसार करा महिमा वाढवावी म्हणून गोरक्षनाथ शिष्यांनसोबत दक्षिणेकडे आले अनेक तिर्थक्षेत्र साधुसंतांना भेट देत असताना एका नगरीत आले त्याठिकाणी त्या नगरीत एक बाल योगी त्यांच तप सामर्थ्य पाहून गोरक्षनाथांना अस वाटलं की हा चमत्कारी बालक आपला शिष्य व्हावा म्हणून प्रयत्न केले पण शिष्याने नकार दिला मी दत्तांचा अनुग्रह घेतला आहे मी तुमचा शिष्य होऊ शकत नाही त्या ठिकाणी ते आपल्या सामर्थ्यामध्ये कमी पडले याची त्यांना खंत वाटली त्यानंतर रात्री झोपल्यानंतर भगवान शंकरांनी आणि मच्छिंद्रनाथांनी त्यांना द्रुष्टांत दिला की तुम्ही महाराष्ट्रात खान्देशातील सिध्द चंद्रवट तिर्थी जावून घोर तप करा म्हणून गोरक्षनाथ सिध्द चंद्रवट तिर्थी आले व त्यांनी घोर तप केले . तप पुर्ण झाल्यावर भगवान शंकरांनी मच्छिंद्रनाथास सांगितलें तुमचा शिष्य तपोपुर्तीमध्ये पारंगत झाला आहे त्याची परिक्षा घ्यावी म्हणून यानिमित्ताने मच्छिंद्रनाथ या ठिकाणी आले त्यांनी सिंहांचा रूप धारण केले आणि नंतर गोरक्षनाथांन समोर आले आवाज काढले डरकारी फोडली तरी गोरक्षनाथांनचा तप भंग झाला नाही ते परिक्षेत उत्तीर्ण झाले मच्छिंद्रनाथास आनंद वाटताच तेथे शिव प्रकट झाले. भगवान शंकरांनी सांगितले तुम्ही दोघे माझे अंश अवतार असल्यामुळे मी आपल्याला आशिर्वाद देतो तुम्हा दोघांच्या निमित्ताने नाथ संप्रदायाचा प्रसार प्रचार व्हावा दुसरा आशीर्वाद दिला तुमचा नाथ संप्रदाय सिद्दीचा सागर बनो तेव्हढ्यात माता पार्वती प्रकट झाल्या म्हणाल्या की तिसरा वर मी देते व त्यांनी ह्या च सिध्द चंद्रवट तिर्थी म्हणजे सप्तश्रृंगीच्या माहेरी गोरक्षनाथांना आणि मच्छिंद्रनाथांना आशीर्वाद दिला की तुमच्या निमित्ताने तुमचे ८४ शिष्य योगी निर्माण होतील व त्यावेळी एका कार्यच्या निमित्ताने मी आवेश अवताराची वाटचाल करील . ८४ शिष्य पुर्ण झाल्यावर त्यांनी याग ठरवला तो याग निफाड तालुक्यातील लोणशाही डोंगर नावाचे उंच शिखर आहे त्याठिकाणी त्यांनी याग केला. म्हैसाचा वध करून ज्यावेळी आदिमाया सप्तश्रृंगी गडाकडे जात असताना झुंबर खाली टाकल पुर्णाहूतीचा काळ व ते झुंबर खाली पडल्यावर त्यातून आदिशक्ती प्रकट झाली माता पार्वतीने वचन दिल्याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांनी सिध्द कुंजिका नावाचा बिज मंत्र दिला यावरून नाथ संप्रदायाची कुलस्वामिनी सप्तश्रृंगी आहे. अशी या सप्तश्रृंगीच्या माहेरची एक एक महिती अलौकिक आहे.
ॐ नमः शिवाय…
जय मातादी…
( श्री क्षेत्र चंद्रवट तीर्थ)
(हे सिद्ध चंद्रवट तीर्थ श्री क्षेत्र खर्ची)
ओम नर्मदेश्वर शिव शक्तीधाम ट्रस्ट श्री क्षेत्र खर्ची
ता-एरंडोल जि-जळगाव
महामंडलेश्वर स्वामी माधवानंन्द सरस्वती
मो, नं ८३२९६४५०३३.
खानदेशाची अतिप्राचीन अति पुरातन गौरवशाली प्रसिद्धीप्रमुख असलेली सुवर्णमयी सिद्ध गोपे खान यावरूनच खानदेश याला खानदेश हे नाव पडले.ती म्हणजे सप्तशृंगी चे माहेर वेद पुराना धार त्याचे नाव सिद्ध चंद्रवत ते श्री शेत्र नर्मदेश्वर ते शिवशक्ती धाम खर्ची आश्रम तालुका एरंडोल जिल्हा जळगाव नऊ हजार वर्षाची यशोगाथा खानदेशाची कीर्ती ध्वजा जगापर्यंत पोहोचवणारे थोर विभूती मत्व वेद वेदांत शास्त्री आचार्य महामंडलेश्वर वर स्वामी माधवानंद सरस्वती खर्ची आश्रम सप्तशृंगी चे माहेर पीठाधीश्वर यांचा अल्प परिचय शालेय शिक्षण दहावी अध्यात्माचे ज्ञान मिळवण्यासाठी चार वर्ष आळंदी सात वर्ष हरिद्वार दोन वर्ष श्री क्षेत्र काशी दोन वर्ष सिद्ध हटयोग साधनेसाठी बिहार येथील मुंगेर योग विद्यालयात अध्ययन आज ते रामायण भागवत दत्तपुराण नर्मदा पुराण तसेच 18 पुराण व जगातील सर्व धर्म पंथ सांप्रदायाचे गाढे अभ्यासक बालपणापासून जप-तप खडतर अणुष्ढाने करणे गोदावरी कैलास बद्री बद्रिकेदार बज्र 84 नर्मदा परिक्रमा पायी परिक्रमा करून आव्हान आखाड्याची संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ओंकारेश्वर येथे निर्जन बेचाळीस दिवस अनु षठाण तेथे प्रत्यक्ष भगवान शंकर व मा नर्मदेचा आदेश सप्तशृंगी अवतार जन्मस्थळ जगापर्यंत पोहोचव त्या जागेचा संशोधन शोध पुण्यक्षेत्र महात्मे तेथे और महा मुनीचे खडतर तप स्थान येथे चंद्राचे तप व वरदान भैरव जोगेश्वरी चे खडतर तप वरदान संतती नाही प्रत्यक्ष भगवान शिवानी जलातून कन्यारत्न दिले ते वज्रेश्वरी चे जन्मस्थळ या स्थळ तिचं या स्थळी तपासाठी तिच्याशी महिषासुराचे तीन जन्मापासूनची वैर तप भंग करण्यासाठी आला तिने टाहो फोडताच शिवपार्वती प्रगट शिव आज्ञा उडव त्याचे शीर म्हणून याच स्थळी महिषाचा वर्धार्थ सिंहारूढ अष्टभुजा अवतार म्हणून माहेर याच स्थळी गोरक्षनाथांचे तप व वरदान नाथ सांप्रदाय सिद्धी चा बनो याच पुण्यक्षेत्री आदिशक्तीचा संकल्प 84 सिद्धांना सिद्ध कुंजिका मंत्राचा अनुग्रह वरदान व याच स्थळी किन्नराची शापमुक्ती वरदान अशा पुण्य सिद्ध आशा पुण्य सिद्ध तीर्थक्षेत्राचा गेली 21 वर्षापासून सेवा प्रचार-प्रसार कथा कीर्तन माध्यमातून करतो यासाठी भाविकांना सर्व पत्रकार न्युज चॅनलवाले मिडिया यांचे अनंत उपकार ज्यांनी हा आदिशक्ती चा महिमा जगापर्यंत पोचवण्याचे कार्य होत आहे सर्वांना आपल्या जीवनामध्ये सिद्धी शक्तीचा लाभ प्राप्त हो.
आचार्य श्री श्री श्री १००८ जगद्गुरु महामंडलेश्वर माधवानंद सरस्वती यांनी सन्यास दिक्षा देऊन माझे पुर्वश्रमी चे रविकिरण वडगावकर या नावाचे श्राध्द विधी व पिंडदान विधी काशी हरिद्वार ऋषिकेश येथे पाचदिवस धार्मिक कार्यक्रम घेऊन पार पडल्या नंतर माझे शिवरुद्रानंद नामकरण केले,नंतर मागील ७फेब्रुवारी २०२२ रोजी पंचदशनाम आव्हान आखाडा महामंडलेश्वर उत्तराधिकारी सप्तश्ंगी चे माहेर सिध्दचंद्रवट मठाश्रम सह १३ आखाडे उत्तराधिकारी पिठाधिश्वर, महामंडलेश्वर महास्वामी म्हणून नियुक्त केले म्हणून सध्याचे नामकरण
श्री श्री १००८ पिठाधिश्वर महामंडलेश्वर महास्वामी शिवरुद्रानंद सरस्वती पंचदशनाम आव्हान आखाडा काशी /हरिद्वार सिध्दचंद्रवट मठाश्रम तिर्थ खर्ची जी जळगाव
आरती माधवानंद स्वामींची
“”””””””ॐ””””””””ॐ”””””””””ॐ”””””
जय माधवानंदा आत्मरामा *सुखकंदा, जय शांती स्वरुपा !!
निवास खर्ची क्षेत्रा माधवानंद नाथा, आरती ओवाळु तव चरणी माथा
!!ध्रु!!
सप्तश्रंगी माहेर निर्मळ, सिध्दचंद्रवट भुवनी सिध्दचंद्रवट भुवनी !!
आठरापुराण मुखोद्गत आसनी कुंजवणी, जय माधवानंद नाथा !!१!!
स्वामी विश्वनाथा तुम्ही वंदीले तिर्थाटन केले स्वामी तिर्थाटन केले !!
सिध्दचंद्रवट पाहुनी२ तिर्थ खर्ची ग्रामा मन रमले
जय माधवानंद नाथा !!२!!
दिव्यस्वरुपा कुसूमसम कांती , झळके शुक्लांभरधारी !!
सचिदानंद स्वरुपा श्रीशिवरुप स्वरुपा महामंडलेश्वरा आचार्य माधवानंद नाथा !!३!!
श्रवण पठण करिता गुरु खान्देश वरिला, स्वामी खान्देश वरिला
निजध्यासाचा ज्ञान दीपाचा२प्रकाश संचरला जय माधवानंद नाथा !!४!!
शिवसममुर्ती ध्यानगुरुचे स्वजवळ मनी भरिले , स्वामी स्वजवळ मनी भरिले
सप्तश्रंगीचे माहेर सिध्दचंद्रवट नमिले जय माधवानंद नाथा !!५!!
अनहत वेणू शंख झालरी , भगवे तनु साजे !!
हाती कमंडलु टाळ मृदंग *गगणांतरी वाजे
जय माधवानंद नाथा !!६!!
गीता मंत्र पुष्पाजंली वाहु , गुरुपद शिवरुद्रा स्वामी गुरुपद शिवरुद्रा !!
तिर्थ प्रसादा सेवुन पावे आनंदा
जय माधवानंद नाथा !!७!!
जय माधवानंदा आत्मरामा सुखकंदा , जय शांती स्वरुपा
निवास खर्ची क्षेत्रा माधवानंदा
आरती ओवाळु तव चरणी माथा !!८!!
आरती रचना
श्री श्री १००८महामंडलेश्वर स्वामी शिवरुद्रानंद सरस्वती
[उत्तराधीकारी]
सिध्दचंद्रवट आश्रम माहेर सप्तश्रंगीचे तिर्थ खर्ची ता एरंडोल जी जळगाव
खूप खूप छान माहिती मिळाली.स्वामी शतशः प्रणाम ??
??
?खूप खूप धन्यवाद ?
ati sunar aise lega mata ke darshan hi huye
*राजराजेश्वरी आई साहेब नमः जे जय माता दी*???????