ह.भ.प.श्री जयेश महाराज भाग्यवंत

ह.भ.प.श्री जयेश महाराज भाग्यवंत

ह.भ.प.श्री जयेश महाराज भाग्यवंत 


मो.न :-9975267601

सेवा :-कीर्तनकार/प्रवचनकार | गायनाचार्य | मृदंगाचार्य_

पत्ता :-मु. आंभे, पो. मांगरूळ, ता.अंबरनाथ , श्रीमलंगगड रोड, जि. ठाणे.

१. वयाच्या आठव्या वर्षांपासून किर्तसेवेला आरंभ.

२. अभियांत्रिकी शिक्षण यशस्वी रित्या पूर्ण करत, किर्तनसेवेच्या माध्यमातून अध्यात्मिक प्रबोधनाचं कार्य सलग १९ वर्षांपासून करतो आहे.

३. सप्टेंबर २०१९ मध्ये, आळंदी येथे झालेल्या राज्यस्तरीय कीर्तन स्पर्धेमध्ये “इंग्रजी भाषेतील कीर्तनसेवा” करण्याचं भाग्य प्राप्त झालं. की ज्यांनतर अनेक सुशिक्षित युवा वर्ग सोबत जोडला गेला.

४. युवकांचं संघटन करून, “सद्गुरुमाऊली अध्यात्मिक सेवा संस्थान” या संस्थेची स्थपणा करून वर्षाकाठी एक अध्यात्मिक कार्य म्हणून “गुरुस्मरण सोहळा” सम्पन्न केला जातो, की ज्या मध्ये ३००+ महिला आणि १००+ तरुण वर्ग हरीपाठाला उपस्थित असतात, कीर्तनाला २५०+ तरुण टाळकरी वर्ग आणि जवळपास ३५००+ श्रोता वर्ग उपस्थित राहतो.

५. अनेक तरुणांना सोबत घेऊन निसर्गाची सेवा म्हणून “वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन” हा उपक्रम सुरू आहे. 

५. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्याचे कार्य.

६. सध्या श्रीतुकारामगाथा आणि श्रीज्ञानेश्वरी यातील निवडक अभंग आणि ओव्या “मराठी व इंग्रजी” अर्थासाहित समाजापर्यंत पोहोच करण्याचा उपक्रम सुरू आहे.

७. वयाच्या २३व्या वर्षी पहिली “भव्य श्रीमद्भागवत कथा” संपन्न झाली व त्याच्या २ वर्षांनंतर “श्रीरामकथा” देखील पार पडली. 

८. काही शाळा आणि महाविद्यालयांमध्ये “शिक्षण-अध्यात्म-विज्ञान” अशा विषयांवर व्याख्याने करण्यात आली. 

कार्यविस्तार:

१. पुण्याच्या एका संस्थेसाठी “तुकोक्ती- The Sayings of Saint Tukaram” या पुस्तकाचं लेखन सुरू आहे.

२. बीड जिल्हा मार्फत सम्पन्न झालेल्या जिल्हास्तरीय हरिनाम सप्ताहात केवळ “महाविद्यालयिन विद्यार्थ्यांसाठी” इंग्रजी किर्तनसेवेचं आयोजन.

२. श्रीगुरुएकनाथमहाराज देगलूरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त स्वतः श्रीगुरुचंद्रशेखरमहाराज देगलूरकर यांच्या आज्ञेने कीर्तनसेवेचा योग.

पुरस्कार:

१. राज्यस्तरीय कीर्तनस्पर्धे मध्ये “इंग्रजी किर्तनासाठी” – उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला.

२. “स्वर्गीय गजानन पाटील जीवन गौरव पुरस्कार – २०१९” कल्याण.

३. कल्याण येथे २००२ साली सम्पन्न झालेल्या कीर्तनस्पर्धे मध्ये बालकीर्तनकार म्हणून द्वितीय पुरस्कार.

ध्येय:

१. वारकरी तत्वज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड घालणे.

२. इंग्रजी भाषेच्या माध्यमातून “वारकरी संतांचं तत्वज्ञान” परदेशात पोहोचविणे.

३. तरुणांना सद्विचारांकडे प्रवृत्त करणे.

४. व्यसनमुक्ती करून समाजातील तरुणांना योग्य पथ प्रदर्शित करणे.

ह.भ.प.श्री जयेश महाराज भाग्यवंत यांची थोडक्यात माहिती:


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *