dasbodh

सार्थ दासबोध

दासबोध (dasbodh) अर्थासहित, विडिओ आणि ऑडिओ सहित वाचण्यासाठी खालील दासबोध दशकांवर क्लिक रा


सार्थ दासबोध दशक १


सार्थ दासबोध दशक २


सार्थ दासबोध दशक ३


सार्थ दासबोध दशक ४


सार्थ दासबोध दशक ५


सार्थ दासबोध दशक ६


सार्थ दासबोध दशक ७


सार्थ दासबोध दशक ८


सार्थ दासबोध दशक ९


सार्थ दासबोध दशक १०


सार्थ दासबोध दशक ११


सार्थ दासबोध दशक १२


सार्थ दासबोध दशक १३


सार्थ दासबोध दशक १४


सार्थ दासबोध दशक १५


सार्थ दासबोध दशक १६


सार्थ दासबोध दशक १७


सार्थ दासबोध दशक १८


सार्थ दासबोध दशक १९


सार्थ दासबोध दशक २०


दासबोध

समर्थांच्या शिष्य मंडळींमध्ये सर्व प्रकारचे शिष्य होत.समर्थांचे एक वैशिष्ट्य होते – समोरचा मनुष्य ज्या पातळीवरचा असेल त्या पातळीवर जाऊन त्याला ते समजावून सांगत. समर्थांची उपदेशाची भाषा अत्यंत साधी सोपी होती. एकदा धोंडीबा नावाच्या शिष्याने समर्थांना विचारले – ‘महाराज, माझ्या मनाची उन्मनी अवस्था कशी होईल? समर्थांनी त्याला त्याच्या भाषेत उत्तर दिले

– ‘ मनाचे ऐकू नकोस म्हणजे तुझ्या हवे तसे होईल. ‘धोंडिबाने ते ऐकले आणि समर्थांचा निरोप घेऊन तो घरी निघाला.’आपण आता घरी जावे’ असे त्याच्या मनात आले पण समर्थांनी तर सांगितले की मनाचे ऐकू नकोस, म्हणून त्याने घरी जायचे नाही असे ठरविले. मग मनात आले, रानात जावे. पण मनाचे ऐकायचे नसल्यामुळे रानातही जाता येईना.

धोंडीबाच्या लक्षात आले की, मनात परस्परविरोधी विचार येत राहतात. अशा वेळी काय करावे? एकदा वाटते घरी जावे, एकदा वाटते घरी जाऊ नये. मग मनाचे ऐकायचे नाही म्हणजे काय? धोंडिबाच्या लक्षात आले की, मनात सतत विचार येत राहतात. ते ऐकायचे नाहीत. म्हणून धोंडिबाने

‘श्रीराम जयराम जय जय राम’ हा जप सुरू केला आणि मनातल्या मनात तो जप ऐकत राहिला. अशा प्रकारे मनात विचार येऊ नये म्हणून तो ७२ तास जप करीत राहिला. ७२ तासांनंतर त्याच्या मनाची उन्मनी अवस्था झाली. अगदी सोप्या शब्दात समर्थांनी उपदेश केला आणि अत्यंत श्रद्धेने धोंडिबाने ते ऐकले, आणि त्याचे भले झाले. (मनाची उन्मनी अवस्था म्हणजे ईश्वरस्वरूपी मिळून जाणे!) अध्यात्मात श्रद्धा असली की लगेच काम होते.

आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर प्रथमत: सामान्य लोकांनाही पारमार्थिक मार्गास लावावे, अशी इच्छा रामदासस्वामींना साहजिकच झाली. पण पुढील १२ वर्षाच्या प्रवासांत त्यांनी जे पाहिले, जे भयंकर विदारक अनुभव घेतले, त्यांनी त्यांच्या चारित्र्यास एक वेगळीच कलाटणी मिळाली. त्या काळी भारतांतील जनता कमालीच्या हीन, दीन, त्रस्त आणि अपमानित अवस्थेत काळ कंठीत होती.

यावनी सत्तेच्या अमानुष जुलुमाखाली भरडली जात होती. लोकांची मालमत्ता, बायका-मुले, आयाबहिणी, देव, धर्म, संस्कृती, काहीच सुरक्षित नव्हते. जनतेची ही हृदयद्रावक अवस्था पाहून समर्थ अत्यंत अस्वस्थ व उद्विग्न झाले.

सर्वस्वी नि:सत्त्व आणि दुर्बल झालेल्या आपल्या समाजास परमार्थाचा उपदेश हानिकारकच ठरण्याचा संभव आहे, समाजाला प्रथम संघटित आणि शक्तिसंपन्न बनविले पाहिजे, समाजाचा लुप्त झालेला आत्मविश्वास पुन: जागृत केला पाहिजे, अशी त्यांची खात्री झाली.

समर्थ रामदास हे निसर्गप्रेमी होते. त्यांनी आपल्या निवासाच्या ज्या जागा निवडल्या त्या सर्व निसर्गरम्य जागा होत्या. आजही चाफळ, शिवथरघळ, सज्जनगड आणि समर्थांच्या वेगवेगळ्या घळी पाहण्यासाठी तरुण गिर्यारोहक गर्दी करतात. काही साहसी तरुण मुले मुद्दाम पावसाळ्यात मोहीम म्हणून समर्थांची तीर्थक्षेत्रे पाहतात.

समर्थांना अंगापूरच्या डोहात दोन मूर्ती सापडल्या; एक श्रीरामचंद्रांची आणि दुसरी तुळजाभवानीची. त्यांतील श्रीरामाची मूर्ती त्यांनी चाफळला स्थापन केली. श्री तुळजा भवानीची मूर्ती स्थापन करण्यासाठी ते सज्जनगडावर आले. सज्जनगडावरील प्रसिद्ध अंग्लाई देवीचे मंदिर आजही याची साक्ष देत आहे. सज्जनगडाच्या पायथ्याला समर्थांना एक बाग तयार करायची होती. या बागेत कोणकोणती झाडे लावावयाची आणि ती कशी लावावीत या संबंधीचे समर्थांचे स्वतंत्र प्रकरण आहे.

यावरून त्यांचा वनस्पतीशास्त्राचा किती अभ्यास होता याची कल्पना येते. बाग प्रकरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कवितेत समर्थांनी सुमारे ३५० वनस्पतींची नवे दिली आहेत. आश्चर्य म्हणजे यादी देताना पालेभाज्या, फळभाज्या, फळ, फूल, औषधी वनस्पती यांची व्यवस्थित वर्गवारी आहे. सज्जनगडावर दोन वर्षे राहून समर्थ शिवथरघळीत आले.

तिथे त्यांनी समर्थ संप्रदायाचा श्रीमद दासबोध हा प्रधान ग्रंथ लिहिला. या ग्रंथात समर्थांनी प्रपंच, राजकारण, संघटन, व्यवस्थापन, व्यवहारचातुर्य, व्यक्तिमत्त्व विकास, सभ्यता आणि शिष्टाचार या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केला आहे. दासबोधातील मूर्खलक्षणे वाचत असताना तर अनेकांना वाटते की, समर्थांनी आपला स्वभाव अचूकपणे कसा ओळखला? जगातील अनेक भाषांमध्ये दासबोधाचा अनुवाद झाला आहे.


दासबोध मराठी अर्थ – dasbodh marathi – dasbodh nirupan – dasbodh marathi arth – dasbodh meaning mararthi – dasbodh granth – dasbodh marathi

1 thought on “सार्थ दासबोध”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *