तुकाराम महाराज

तुकाराम महाराज

संत तुकाराम महाराज आज जगाच्या कानाकोप-यात प्रत्येकाला माहीत असतील; परंतु महाराजांच्या विविध अवतारकार्यामुळेच ते तुकाराम झाले हे काहीच लोकांना माहीत असेल. तुकाराम कोणाचे अवतार, त्यांनी मनुष्यदेहाचे सार्थक कसे केले असे नानाविध प्रश्न आपल्या मनात असतीलच.

संत तुकाराम (ऊर्फ तुकोबा) हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचाविठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदेव होते. तुकारामांना वारकरी ‘जगद्‌गुरु ‘ म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी – ‘ पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय’ असा जयघोष करतात.जगद्गुरु तुकाराम लोककवी होते.

मूळ नाव : तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)

जन्म : इ.स. १५९८, देहू, महाराष्ट्र

निर्वाण : इ.स. १६५०, देहू, महाराष्ट्र

संप्रदाय : वारकरी संप्रदाय, चैतन्य संप्रदाय

गुरू : केशवचैतन्य (बाबाजी चैतन्य),ओतूर

शिष्य : निळोबा बहिणाबाई भगवानबाबा

भाषा : मराठी

साहित्यरचना : तुकारामाची गाथा (पाच हजारांवरअभंग)

कार्य : समाजसुधारक, कवी, विचारवंत, लोकशिक्षक

संबंधित तीर्थक्षेत्रे : देहू

व्यवसाय : वाणी

वडील : बोल्होबा अंबिले

आई : कनकाई

पत्नी : आवळाबाई

तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे.

भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य यांच्या शब्दकळेत पाझरते. त्यांचे अभंग म्हणजे ‘अक्षर वाङ्‌मय’ आहे. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगलेखनाबरोबरच गवळणीही रचल्या.

संत तुकारामाच्या अभंगाचा अनेकांनी अनेक अंगानी अभ्यास करून त्यांचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

तुकारामांचे अवतारसंत तुकोबा

पुराण कथेनुसार तुकाराम महाराजांचा पृथ्वीतलावरील अवतार म्हणजे सत्ययुगातील अंबऋषी. अंबऋषी या अवताराबद्दल सांगायचे म्हणाल तर अंबऋषीस्वरूप तुकोबाराय प्रथमत: दुर्वासऋषींचे शिष्य होते. गुरू-शिष्यांमध्ये थोडय़ा प्रमाणात कलह झाला. दोघांनीही शक्तिप्रदर्शन केले. दुर्वासऋषींनी अंबऋषींवर सुदर्शन चक्र सोडले. यातून पळ काढत अंबऋषी ब्रह्मलोकांत पोहोचले; पण सुदर्शन चक्राने त्यांचा पाठलाग सोडला नाही. शेवटी ते वैकुंठात गेले. भगवान विष्णूंची शरणागती पत्करली. त्यांनी अंबऋषींना दुर्वासांना शरण जा, असे सांगितले. यानंतर दुर्वासऋषींनी सुदर्शन चक्र रोखले, मात्र तुला प्रत्येक अवतारकार्यात गर्भवास सोसावा लागेल, असा शापही दिला.

महाराजांचे चार युगांप्रमाणे अवतार, पहिल्या अवतारात म्हणजेच कृतयुगात तुकोबाराय प्रल्हादस्वरूप होते. या अवतारात त्यांचे आराध्य दैवत श्री भगवान विष्णू होते. दुस-या अवतारात त्रेतायुगात तुकोबाराय अंगदस्वरूप होते. तर तिस-या अवतारात द्वापारयुगात तुकाराम महाराज उद्धव स्वरूप होते. कलियुगात चौथ्या अवतारात ते नामदेवराव होते. तर पाचवा अवतार हा तुकाराम नावाने जगात प्रसिद्ध झाला आहे. याची साक्ष देणारा अभंग

। जे जे झाले अवतार। तुका त्यांचे बरोबर।

सत्ययुग : अंबऋषी, गुरू : दुर्वासऋषी आणि आराध्य : विष्णू
कृतयुग : प्रल्हाद, गुरू आणि आराध्य : भगवान विष्णू

त्रेतायुग : अंगद, गुरू आणि आराध्य : राम


द्वापारयुग : उद्धव, गुरू आणि आराध्य : भगवान कृष्ण


कलियुग : नामदेव, गुरू : येसोबा खेचर, आराध्य : भगवान परमात्मा पांडुरंग


कलियुग : तुकाराम, गुरू : बाबाजी चैतन्य आणि
आराध्य : भगवान परमात्मा पांडुरंग

वंशावळी

 • विश्वंभर आणि आमाई अंबिले

यांना दोन मुले हरि व मुकुंद

 • यांतील एकाचा मुलगा विठ्ठल
 • दुसऱ्याची मुले –
 • पदाजी अंबिले
 • शंकर अंबिले
 • कान्हया अंबिले
 • बोल्होबा आणि कनकाई अंबिले

यांना तीन मुले

 • सावजी (थोरला) तीर्थयात्रेला जाण्यासाठी घर सोडले.
 • तुकाराम व कान्होबा( धाकटा )

तुकाराम महाराजांचा परिवार आणि शिष्यगण

संत तुकाराम महाराज यांचे पूर्ण नाव तुकाराम वोल्होबा आंबिले (मोरे). तुकोबा मूळचे देहू गावचे स्थायिक होते. कुटुंबात आई कणकाई, वडील वोल्होबा मोरे, थोरला भाऊ सावजी आणि धाकला भाऊ कान्होबा असा परिवार होता. महाराजांची पहिली पत्नी रखमाबाई आणि दुसरी जिजाबाई ऊर्फ अवली. महाराज आणि रखमाबाई यांचा पहिला पुत्र संतू. यानंतर अवली हिची मुले पहिली मुलगी गंगा, दुसरा व तिसरा मुलगा भोळ्या आणि विठू,चौथी मुलगी भागीरथी. 

महाराजांचे आराध्य दैवत विठोबा. महाराजांचे गुरू बाबाजी चैतन्य. महाराजांचे शिष्य नाहुजी आणि बहेनाबाई शिऊरकर. स्वर्गारोहणानंतरचे महाराजांचे शिष्य निळोबाराय व कान्होबाराय. तुकाराम महाराज हे नामदेवांचे अवतारकार्य पूर्ण करण्यास आले होते याची साक्ष देणारा अभंग

। प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी।
। उरले ते शेवटी लावी तुका।

जीवनोत्तर प्रभाव

संत बहिणाबाई शिवुर ता.वैजापूर ही तुकारामांची शिष्या. तुकारामांनी तिला स्वप्नात गुरूपदेश दिला होता. तुकाराममहाराजांनीं वैकुंठगमन केल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तिला साक्षात दर्शन दिले होते, असे म्हणतात. तुकारामांनी बहिणाबाईला बौद्धांच्या ’वज्रसूची’ या बंडखोर ग्रंथाचे मराठी भाषांतर करायला सांगितले होते.यावरून तुकाराम महाराज पाळीत असलेल्या धर्माचे स्वरूप किती उदार होते याची कल्पना यावी.

तुकाराम महाराजांवर सद्गुरुकृपा

तुकाराम महाराज यांचे सद्गुरू बाबाजी चैतन्य यांनी महाराजांना बीजमंत्र दिला. त्यांच्या कृपाशीर्वादाने महाराजांना ज्ञान प्राप्त झाले.

। माझिये मनीचा जाणोनिया भाव। तो करी उपाव गुरूरावो।
। आवडीचा मंत्र सांगितला सोपा। जेणे नोहे गुंफा कोठे काही।
 

तुकाराम महाराजांना वैराग्यप्राप्ती कशी झाली..?

तुकाराम महाराजांना साधुसंतानी विचारले, महाराज तुम्हाला वैराग्यप्राप्ती कशी झाली. यावर महाराज म्हणतात, अहो मला वैराग्यप्राप्ती झाली नाही, माझ्या विठूरायाने ती घडवून आणली. काय माझे होते जे मी गमावले, ज्यामुळे मला वैराग्य प्राप्त होईल. दुष्काळात माझी एक पत्नी अन्न अन्न करून मेली. होते नव्हते ते द्रव्य गेले, मग माझ्याकडे देवभक्तीशिवाय पर्यायच राहिला नाही. देवाला ही दुष्काळात नैवेद्य मिळत नव्हता म्हणून वाटलं भक्ती करावी. आरंभी एकादशीला कीर्तन करत होतो. पण अभ्यासात चित्त नव्हते. मी संसाराधीन होतो. संतांची पदं पाठ करून मी कीर्तन करायचो. मग सद्गुरूंनी कृपा केली. त्यांच्या वचनाने मला वैराग्य प्राप्त झाले,

महाराज म्हणतात, या संसारात मी खूप त्रासलो होतो. धनामागे पळण्याची आस मेली होती; त्यामुळे मी धन याचकांना दिले. प्रिय व्यक्तींचा सहवास सोडला आणि मी करंटा झालो. लोकांपासून दूर राहण्यासाठी मी रानावनांत एकांत शोधला.

हे पण वाचा:- श्री तीर्थक्षेत्र देहू मंदिर माहिती 

संत तुकाराम महाराज यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांना उपदेश

एके दिवशी छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांचे दर्शन, सत्संग आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी देहू या गावी गेले होते. ईश्‍वरनिष्ठ महापुरुषाला पाहून ते इतके प्रभावित झाले की, त्यांच्या कृपेची याचना करू लागले; परंतु दूरदृष्टीसंपन्न लोकसंत तुकाराम महाराजांनी त्यांना समर्थ रामदासस्वामींना शरण जाण्याचा उपदेश केला.

छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश

संत तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना क्षात्रधर्म म्हणजे काय, हे सांगून राजधर्म समजावला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांच्या कीर्तने आणि मार्गदर्शने यांतून प्रेरणा घेतली. 

तुकाराम महाराज वैकुंठ गगन

पण अनेक चरित्रकारांना तुकोबांच्या मृत्यूबद्दलची ही शक्यता अजिबात मान्य नाही. तुकारामांचे वंशज श्रीधरमहाराज मोरे (देहूकर) यांनी तुकाराम महाराजांचे चरित्र लिहिले आहे. या पुस्तकात तुकारामांच्या प्रयाणाविषयी एक प्रकरण आहे. 

श्रीधरमहाराज लिहितात- ‘इंद्रायणीकाठी तुकोबांचं कीर्तन सुरू होतं. त्यांनी सर्वांना ‘आम्ही वैकुंठाला जात आहोत, तुम्ही माझ्याबरोबर वैकुंठाला चला’ असं सांगितलं. १४ टाळकऱ्यांनी क्षेमालिंगन दिले.सकळही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावा ।। अशी सूचनाही केली. आणि भगवतकथा करीत असता तुकोबा अदृश्य झाले.’

या प्रयाणाचा उल्लेख राज्याभिषेक शके 30च्या देहूगावच्या सनदेत आहे असं श्रीधरमहाराजांनी लिहिलं आहे. ‘तुकोबांच्या गुप्त होण्याने सर्वत्र मंडळी शोकसागरात बुडाली. तुकोबांची मुले, बंधू, अनुयायी तेथेच बसून राहिले. पंचमीला तुकोबांचे टाळ, पत्र, कथा आकाशमार्गे आली. रामेश्वरशास्त्रींनी निर्णय दिला. तुकोबा सदेह वैकुंठाला गेले.


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

संत तुकाराम महाराज अभंग व अर्थ, संत तुकाराम निबंध, संत तुकाराम फोटो, संत तुकाराम महाराजांची कथा, संत तुकाराम महाराज चरित्र, संत तुकाराम अभंग, तुकाराम महाराज हरिपाठ, संत तुकाराम महाराजांची माहिती Sant Tuakaram Information In Marathi

6 thoughts on “तुकाराम महाराज”

  1. 8080062781
   वरील नंबर ला व्हाट्सअँप वर तुमचे नाव शिक्षण पत्ता व सविस्तर माहिती पाठवा

 1. अनंत सुर्यवंशी

  सत तुकाराम महाराज यानी छत्रपती शिवाजी महाराज यांना केलेला उपदेश या शिर्षकाखाली लिहिलेला अभंग गाथा या मध्ये नाही . तो अभंग चुकिचा वाटतो कृपया आपण कोठून घेतला ते संदर्भासह सांगावे

Leave a Comment

Your email address will not be published.